Marathi News> मनोरंजन
Advertisement

Tarak Mehta : बॉलिवूडमधील 'या' लोकप्रिय अभिनेत्याने नाकारलेली जेठालालची भूमिका?

भूमिका नाकारल्यामुळे आता नेमकं काय वाटतंय? 

Tarak Mehta : बॉलिवूडमधील 'या' लोकप्रिय अभिनेत्याने नाकारलेली जेठालालची भूमिका?

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी टीव्ही मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा'  (Tarak Mehta Ka Ooltah Chashmah) छोट्या पडद्यावर अतिशय लोकप्रिय आहे. कार्यक्रमातील प्रत्येक भूमिका साकारणारे कलाकार घराघरापर्यंत पोहोचले आहेत. या कार्यक्रमाशी संबंधित अनेक गोष्टी प्रेक्षकांना वाचण्यासही आवडतात. 

हंगामा 2 मध्ये दिसणार राजपाल यादव 

राजपाल यादव यांनी एका मुलाखतीत खास किस्सा सांगितला आहे. राजपाल यादव यांना हंगामा 2 हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा प्रोमो आणि ट्रेलर व्हिडीओ रिलीज झाला आहे. या कलाकारांनी सिनेमाच्या प्रमोशनचं काम सुरू केलं आहे. आरजे सिद्धार्थ कननसोबत असताना एक खास किस्सा शेअर केला आहे.

राजपाल यादव यांनी का नाकारली होती भूमिका 

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील लोकप्रिय भूमिका साकारणारे दिलीप जोशी यांच्या अगोदर राजपाल यादव 'जेठालाल' ची भूमिका साकारण होते. मात्र राजपाल यादवने तेव्हा हा शो रिजेक्ट केला होता. आता हा शो रिजेक्ट करण्यावर राजपाल यादव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजपाल यादव म्हणातात,'त्याला ही भूमिका सोडल्याचा कोणताच पश्चाताप नाही. तसेच लोकप्रिय जेठालाल हे कॅरेक्टर न करत असल्याचं कोणत रिग्रेट देखील नाही.' 

राजपाल यादवने सांगितली ही गोष्ट 

राजपाल यादव (Rajpal Yadav) ने एका मुलाखतीत सांगितलं होतं की,'जेठालाल या लोकप्रिय भूमिकेची ओळख एका चांगल्या अभिनेत्याकडून झाली आहे. प्रत्येक भूमिका ही एका कलाकाराची असते, असं मला वाटतं. आपण सगळे एंटरटेन्मेंटच्या मार्केटमध्ये आहेत. मी कुणा दुसऱ्याच्या कॅरेक्टरमध्ये स्वतःला फिट करू शकत नाही. जी भूमिका माझ्यासाठी आहे ती मला मिळणारच.'

Read More