Marathi News> मनोरंजन
Advertisement

Sachin Shroff Wedding: सचिन श्रॉफ अडकला लग्नबंधनात, बबितासह अंजलींनी लावली खास हजेरी

TMKOC:  'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील नवीन तारक मेहता दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला असून सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचा पहिला फोटो समोर आला आहे.

Sachin Shroff Wedding:  सचिन श्रॉफ अडकला लग्नबंधनात, बबितासह अंजलींनी लावली खास हजेरी

Sacchin Shroff Wedding Pics: 'प्रसिद्ध टीव्ही शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेतील अभिनेता सचिन श्रॉफ (Sacchin Shroff) 25 फेब्रुवारीला इव्हेंट आयोजक आणि इंटिरियर डिझायनर चांदनी कोठीसह लग्नबंधनात अडकला. गेल्या काही दिवसांपासून तारक मेहता या भूमिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सचिनच्या लग्नानंतर या दोघांच्या लग्नाचे पहिले फोटो समोर आले आहेत.

तारक मेहतामधील सचिन श्रॉफ हा एक लोकप्रिय अभिनेता आहे. अनेक मालिकांच्या माध्यमातून सचिनने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. 'आश्रम' या वेबसीरिजच्या माध्यमातून त्याने OTT विश्वात पदार्पण केले. 2008 सालापासून तो प्रेक्षकांचे मनोरंजन करत असून सध्या सचिन 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

सचिन श्रॉफच्या लग्नाचा पहिला फोटो व्हायरल 

 'गम है किसी के प्यार में' या मालिकेतील को-स्टार ऐश्वर्या शर्माने सचिन श्रॉफच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमध्ये सचिन आणि त्याच्या सह कलाकरांसोबत दिसत आहे. तसेय या फोटोमध्ये 'TMKOC' आणि 'GHKPM' या दोन्हीचे सह-कलाकार दिसत आहेत. 

वाचा: ही संधी सोडू नका! सोने-चांदी झालं स्वस्त, खरेदीकरण्यापूर्वी जाणून घ्या आजचे दर 

सचिन श्रॉफ-चांदनीचा वेडिंग लूक

सचिन श्रॉफने लग्नात केशरी रंगाची शेरवानी परिधान केले तर वधू चांदनीने निळ्या रंगाच्या सुशोभित लेहेंगा परिधान केले आहे. 

fallbacks

सचिन श्रॉफची कॉकटेल पार्टी

सचिन श्रॉफने लग्नाच्या एकदिवसापूर्वी इंडस्ट्रीतील मित्रांसाठी कटेल पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये सचिन आणि त्याच्या पत्नीसह जेनिफर मिस्त्री, अंबिका रांजणकर आणि सुनैना फौजदार, पलक सिंधवानी, कुश शहा, तन्वी ठक्कर, यश पंडित, स्नेहा भावसार, किशोर शहाणे, शीतल मौलिक, ऐश्वर्या शर्मा, मुनमुन दत्ता, बॉबी देओल, वहबिज दोराबे, वाहबिल दोराबजे, स्नेहा भावसार. समय शाह आणि नितीश भालुनी यांचा सहभाग होता.

 

सचिनचे पहिले लग्न जुही परमारसोबत (Juhi Parmar)  झाले होते. एका मालिकेच्या शूटिंगदरम्यान त्यांची भेट झाली होती. या मालिकेदरम्यान त्यांची मैत्री झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. जयपूरच्या एका महालात त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला होता. पण पुढे दोघांमध्ये सतत मतभेद सुरू झाले आणि त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.   

Read More