Marathi News> मनोरंजन
Advertisement

VIDEO : तैमूर फोटोग्राफर्सवर भडकला आणि काचेवर धडकला....

तैमूरच्या अशा वागण्याने भडकली बेबो 

VIDEO : तैमूर फोटोग्राफर्सवर भडकला आणि काचेवर धडकला....

मुंबई : तैमूरचे असंख्य व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. करिश्मा कपूरच्या मुलीचा समायरा गुरूवारी 16 वा वाढदिवस साजरा केला. या बर्थ डे पार्टीला करिना कपूर आणि तैमूर पोहोचले होते. यावेळचा तैमूरचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यावेळी फोटोग्राफर्स तैमूर आणि करीनाचे फोटो काढत असताना अचानक तैमूर भडकला (Taimur Shout on Photographers) आणि काचेवर आदळला हा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला असून तो व्हायरल होत आहे. 

तर झालं असं की, करीना गाडीतून बाहेर पडली. त्यानंतर फ्रोटोग्राफर्सने तिला आवाज देत तिने त्यांना पोझ दिली. त्या मागोमाग तैमूर देखील गाडीतून बाहेर आला. तैमूर गाडी बाहेर येताच तो फोटोग्राफर्सवर भडकला. ओरडून तो आत पळून जाणार इतक्यात तो काचेच्या दरवाज्यावर धडकला. 

त्यावेळी लगेचच करीना आणि स्टाफच्या लोकांनी त्याला पकडले. मात्र तैमूरच्या अशा वागण्याने करीना चांगलीच नाराज झालेली दिसली. पण त्यानंतरही तिने फोटोग्राफर्सला बाय केलं आणि ती निघून गेली. 

तैमूरचे अगदी जन्मापासूनचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सेलिब्रिटींप्रमाणेच पापाराझीचे फोटोग्राफर्स तैमूरला फॉलो करत असतात. तैमूर आता मोठा भाऊ झाला आहे. कोरोनाने काही दिवसांपूर्वीच दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. या मुलाचा फोटो सोशल मीडियावर अजून आलेला नाही. चाहते त्याचे फोटो पाहण्यासाठी आतुर आहे. 

Read More