Marathi News> मनोरंजन
Advertisement

'मिल्की ब्यूटी' म्हणणाऱ्या पत्रकाराला तमन्ना भाटियाचं सडेतोड उत्तर, म्हणाली 'एका महिलेला...'

Tamannah Bhatia on Being Called Milky Beauty : तमन्ना भाटियाला साध्वी शिवा शक्तीच्या भूमिकेत पाहून पत्रकारानं विचारला हा प्रश्न... तर संतप्त अभिनेत्रीनं दिलं असं उत्तर

'मिल्की ब्यूटी' म्हणणाऱ्या पत्रकाराला तमन्ना भाटियाचं सडेतोड उत्तर, म्हणाली 'एका महिलेला...'

Tamannah Bhatia on Being Called Milky Beauty : लोकप्रिय अभिनेत्री तमन्ना भाटिया ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत होती. पण आता तिचं चर्चेत येण्याचं कारण तिचा आगामी चित्रपट 'ओडेला 2' आहे. नुकतीच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख समोर आली असून हा चित्रपट 17 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं आहे. या पोस्टरमध्ये तमन्ना ही साध्वी शिवा शक्तीच्या भूमिकेत दिसत आहे. चित्रपटासंबंधीत एका कार्यक्रमा दरम्यान, एका पत्रकारानं दिग्दर्शकाला विचारलं की 'मिल्की ब्यूटी' ला काय विचार करून साध्वीची भूमिका दिली. तमन्नानं यावर जे उत्तर दिलं त्यांची सगळीकडे स्तुती होत आहे. 

तमन्ना कोणत्या भूमिकेत फिट?

चित्रपटाच्या प्रेस मीट दरम्यान, एका पत्रकारानं तमन्नाला 'मिल्की ब्यूटी' असल्यानं शिवा शक्तिच्या भूमिकेत योग्य नसल्याचं म्हटलं. यावर संतप्त तमन्नानं तिला सडेतोड उत्तर दिलं आहे. खरंतर, एक महिला पत्रकारानं चित्रपटाचे दिग्दर्शक अशोक तेजा यांना विचारलं की 'तुम्ही एका मुल्की ब्यूटीकडे पाहून हा विचार कसा केला की ती एक शिवा शक्ती होऊ शकते?' तमन्नाला त्या पत्रकारानं असं बोलणं  आवडलं नाही आणि तिनं सडेतोड उत्तर दिलं. 

तमन्ना उत्तर देत म्हणाली, "तुझ्या प्रश्नातच याचं उत्तर आहे. ते 'मिल्की ब्यूटी'कडे अशा नजरेनं नाही पाहत की त्यावर लाज वाटायला हवी किंवा तिला वाईट वाटायला हवं. एका महिलेत ग्लॅमर असणं चांगली गोष्ट आहे. आपण महिलांना यावर आनंद झाला पाहिजे. तेव्हा आम्ही दुसऱ्या लोकांकडून इतकी स्तुती करण्याची अपेक्षा ठेवू शकतो. जर आम्ही स्वत: ला एका विशिष्ठ पद्धतीनं पाहू लागलो तर कोणीच आपला आदर करणार नाही."

हेही वाचा : 13 वर्षांचा मुलगा करतो मर्डर; सस्पेन्स-थ्रिलर असलेली 'ही' सीरिज नेटफ्लिक्सवर नंबर 2 ला ट्रेंड

तमन्ना पुढे म्हणाली, "हे असे व्यक्ती आहेत जे महिलांकडे त्या पद्धतीनं पाहत नाहीत. ते महिलांना (दैवी) समजतात. डिव्हाइन ग्लॅमर असू शकतात. जिवघेणा आणि पावरफुल देखील असू शकतात. एक महिला खूप काही असू शकते."

Read More