Marathi News> मनोरंजन
Advertisement

धक्कादायक! रिक्षात सापडला अभिनेत्याचा मृतदेह

अभिनेत्यावर आली अशी वेळ

धक्कादायक! रिक्षात सापडला अभिनेत्याचा मृतदेह

मुंबई : अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका अभिनेत्याचा मृतदेह ऑटो रिक्षात (Auto Riksha) सापडला आहे. बुधवारी म्हणजे 24 मार्च रोजी या अभिनेत्याचा मृतदेह एका रिक्षात सापडला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्याला आर्थिक चणचण जाणवत होती. (Tamil Actor Viruchagakanath Babu found dead in a Auto Riksha ) 

तमिळ अभिनेता विरुत्छगाकांत (Virutchagakanath) यांचा बुधवारी 24 मार्च रोजी मृतदेह चेन्नईत एका ऑटो रिक्षात सापडला आहे. अनेक काळापासून फिल्म इंडस्ट्रीत स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करणाऱ्या विरुत्छगाकांत यांचं निधन झाल्यामुळे सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्याने झोपेतच जगाचा निरोप घेतल्याचं समजतंय. मात्र अद्याप अभिनेत्याच्या मृत्यूच कारण स्पष्ट झालेलं नाही. मात्र अभिनेत्याची गेल्या अनेक दिवसांपासून आर्थिक स्थिती खालावलेली होती. 

अभिनेता आई-वडिलांच्या निधनानंतर खूप निराश झाला होता. यानंतर त्याला सिनेमात काम मिळणं बंद झालं आणि संकटात आणखी वाढ झाली. परिस्थिती एवढी खालावली की अभिनेत्याला ऑटो रिक्षात राहावं लागत होतं. अनेकदा त्याला मंदिरांच्या बाहेर देखील पाहिलं आहे. 

यानंतर अभिनेत्याच्या आर्थिक स्थितीसोबत त्याची मानसिक आणि शारिरीक स्थिती देखील खालावली. मिळालेल्या माहितीनुसार, दिग्गदर्शक साई धीना विरुत्छगाकांत अभिनेत्याच्या मदतीसाठी पोहोचले. एका मंदिरात दिग्दर्शकाने अभिनेत्याशी संवाद साधला आणि घरी घेऊन गेले.

दिग्दर्शकाने व्हिडिओ तयार करून अभिनेत्याला काम मिळावं असं आवाहन केलं. पण त्यांच्या अपीलनंतरही कुणीही दिग्दर्शकाकडे लक्ष दिलं नाही आणि अभिनेत्याला काम मिळालं नाही. आज या अभिनेत्याचा मृत्यू झाला आहे. 

Read More