Marathi News> मनोरंजन
Advertisement

शाकाहारी जेवणात Chicken चा तुकडा मिळताच कंपनीकडून सेलब्रिटीला 70 रुपयांची नुकसानभरपाई, संतप्त प्रकार उघड

पुन्हा चर्चा, 70 रुपयांची... यावेळी मात्र प्रकरण गंभीर 

शाकाहारी जेवणात Chicken चा तुकडा मिळताच कंपनीकडून सेलब्रिटीला 70 रुपयांची नुकसानभरपाई, संतप्त प्रकार उघड

Tamil Lyricist Ko Sesha : 'अशी ही बनवाबनवी' या चित्रपटातील '70 रुपये वारले... ' हा विनोद मराठी भाषिक प्रेक्षकांना आठवतच असेल. एकाएकी हे 70 रुपये आठवण्यामागचं कारण म्हणजे आता त्यावरून एका मोठ्या वादाला तोंड फुटलं आहे. निमित्त ठरतंय ते म्हणजे ऑनलाईन मागवलेलं जेवण. 

तामिळ कलाजगतातील लोकप्रिय गीतकार को शेशा (Tamil Lyricist Ko Sesha ) सध्या त्याच्या कोणत्या गाण्यामुळे नव्हे, तर जेवेणाविरोधात नाराजीचा सूर आळवल्यामुळं चर्चेत आला आहे. 

शाकाहारी जेवण मागवणाऱ्या शेशाला त्याच्या जेवणात अचानकच मांसाहाराचा तुकडा आढळला आणि त्यालाही धक्का बसला. त्यानं हा संपूर्ण अनुभव सोशल मीडिया पोस्टद्वारे शेअर केला. इतकंच नव्हे, तर त्याने आपल्याला डिलीव्हरी कंपनीकडून देण्यात आलेल्या विचित्र उत्तराचाही उल्लेख या पोस्टमध्ये करत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. 

पोस्टमध्ये त्यानं काय लिहिलं? 

'मी Swiggy वरून (Corn Fried Rice) कॉर्न फ्राईड राईससोबत गोभी मंचुरियन मागवलं होतं. त्यात मला एक Chicken चा तुकडा मिळाला. याहूनही वाईट गोष्ट अशी, ती धार्मिक भावना दुखावल्याबद्दल स्विगीच्या कस्टमर केअरकडून मला नुकसानभरपाई म्हणून 70 रुपये परत करण्याची ऑफर दिली. '

आतापर्यंत कधीच मांसाहाराला स्पर्शही न करणाऱ्या शेशानं आपल्या धार्मिक भावनांना विकत घेण्याचा हा लज्जास्पद प्रकार पाहता, त्याला कडाडून विरोध केला. Swiggy तर्फे झाल्या प्रकरणी आपली माफी मागण्यात यावी अन्यथा कायदेशीररित्या कारवाई करण्याचा हक्क मी बजावू शकतो, असा इशारा त्यानं दिला. 

fallbacks

Online Food Delivery App वरून जेवण मागवणाऱ्यांसोबत असा प्रकार घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीसुद्धा बऱ्याच ग्राहकांनी सदर प्रकरणी आवाज उठवला आहे. परिणामी कामात होणाऱ्या या चुका App आणि सदर हॉटेल्सकडून टाळण्यात येण्यासाठी अनेकजण आग्रही दिसत आहेत. 

Read More