मुंबई : कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत आहे. या कोरोनामुळे प्रत्येकजण स्वतःची काळजी घेत आहे. तामिळनाडू सध्या निवडणूका सुरू आहे. अनेक दिग्गज कलाकार, नेते मंडळी मंगळवारी मतदान केंद्रावर मतदान करण्यास गेले होते. यामध्ये AIADMK के के.पलानिस्वामी, ओ.पनीरसेल्वम, DMK चीफ एम.के. स्टैलिन, रजनीकांत, अजीत कुमार, विजय आणि कमल हासन उपस्थित होते. आता एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Thala #Ajith sir asks Sorry.
— Ajith (@ajithFC) April 6, 2021
| Credit: Indiaglitz | #ValimaiFirstLookOnMay1st | #Valimai | #Ajithkumar | pic.twitter.com/cIEkZk7dxm
व्हिडिओत एक चाहता आपल्या पत्नीसह मतदान करण्यात आला होता. त्यावेळी अभिनेत्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी चाहत्याने मास्क घालता नव्हता. अजीत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत असताना चाहत्याचा मोबाइल खेचून घेतात.
पुढच्या व्हिडिओत आपल्याला दिसतं की, अभिनेता त्या प्रेक्षकाला मास्क घालण्यास बजावतात आणि त्याचा फोन परत करतात. आणि त्याला सॉरी बोलतात. अजितला सपोर्ट करणारे अनेक चाहते या व्हिडिओचं कौतुक करत आहेत.
#ThalaAjith Requested his Fans to wear Mask!☺
— Alangar Cinemas Tirunelveli (@AlangarCinemas) April 6, 2021
Nice gesture by him TamilNaduElections2021pic.twitter.com/2t3O6S8ydL
कोरोनाच्या काळात सर्व नियम पाळण अत्यावश्यक आहे. अशावेळी भावनांपेक्षा नियमांना महत्व देणं गरजेचं आहे. त्यामुळे या व्हिडिओची जोरदार चर्चा रंगत आहे.
अनेक बॉलिवूड कलाकारांना आता कोरोनाची लागण झाली आहे. ज्यामध्ये रणबीर कपूर (Ranbir Kapoor), विक्की कौशल (Vickky Kaushal), कटरीना कैफ (Katrina Kaif), आलिया भट्ट (Alia Bhatt), गोविंदा (Govinda), परेश रावल (Paresh Rawal), भूमि पेडनेकर (Bhoomi Pednekar)आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) सह बऱ्याच कलाकारांचा समावेश आहे. यामुळे प्रत्येक जण आपली योग्य ती काळजी घेत आहे.