Marathi News> मनोरंजन
Advertisement

तनुश्री दत्ता या कारणामुळे सोशल मीडियावर ट्रोल

यामुळे झाली ट्रोल 

तनुश्री दत्ता या कारणामुळे सोशल मीडियावर ट्रोल

मुंबई : तनुश्री दत्ता गेल्या कित्येक दिवसांपासून #MeToo प्रकरणामुळे खूप चर्चेत आली. तनुश्रीने नाना पाटेकरांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप लावले आहेत. असं असताना आता सोशल मीडियावर तनुश्री ट्रोल झाली आहे. याचं कारण म्हणजे तिचे आताचे फोटो 

तनुश्रीने सोशल मीडियावर फोटोशूट शेअर केलं आहे. या फोटोंवर युझर्सने अनेक प्रश्न उभे केले आहेत. या फोटोत तनुश्री निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. तनुश्री अगदी स्टायलिश अंदाजात दिसत आहे. #MeToo चं प्रकरण ताजं असताना तनुश्रीचे हे फोटोशूट खूप काही बोलून जातं. तनुश्री फक्त आणि फक्त आपल्या पब्लिसिटीकरता हे करत असल्याचं म्हटलं जात आहे. तनुश्रीच्या या फोटोवर लाईक्ससोबतच अनेक कमेंट्स देखील आहेत. अनेक चाहत्यांनी तिला या फोटोमुळे टार्गेट देखील केलं आहे. 

चाहते असं म्हणतात की, ज्या व्यक्तीवर लैंगिक अत्याचार झाला असेल तर ती व्यक्ती लाइमलाईटमध्ये येण्यासाठी इतके प्रयत्न नाही करत. नाना पाटेकरांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप लावून तनुश्रीला चर्चेत राहायचं आहे. सध्या तिला कोणी काम देत नाही यामुळे सतत चर्चेत राहण्यासाठी ती हे प्रयत्न करत आहे.

Read More