Marathi News> मनोरंजन
Advertisement

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: टीव्हीवर 'पुष्पा'ची दहशत! जेठालालचा मुलगा 'टप्पू' बनला खलनायक

'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेला भव्य गांधी आता मालिका सोडल्यानंतर पाच वर्षांनी पुनरागमन करत आहे. एका नवीन मालिकेमध्ये अभिनेता पूर्णपणे नवीन अवतारात दिसणार आहे. 

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: टीव्हीवर 'पुष्पा'ची दहशत! जेठालालचा मुलगा 'टप्पू' बनला खलनायक

Pushpa Impossible:'तारक मेहता का उल्टा चश्मा' या लोकप्रिय टीव्ही मालिकेमध्ये टप्पूच्या भूमिकेसाठी ओळखला जाणारा भव्य गांधी टीव्हीवर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. अभिनेता आता टप्पूच्या पात्राच्या पूर्णपणे विरुद्ध खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या घोषणेपासून त्याच्या चाहत्यांमध्ये एक विशेष उत्साह पाहायला मिळत आहे..

या मालिकेत दिसणार 'टप्पू'

मालिकेचा टीझर रिलीज झाल्यापासून चाहते त्याच्या टप्पू सेनेच्या प्रमुखाला आणखी एका नव्या भूमिकेत पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. आता हा अभिनेता सोनी सबची नवीन मालिका 'पुष्पा इम्पॉसिबल'मध्ये दिसणार आहे. टीझरच्या रिलीजसोबतच निर्मात्यांनी एक दमदार कॅप्शनही दिले आहे.

त्यांनी म्हटलं आहे की, जो आजपर्यंत सर्वांच्या डोळ्यांचे पारण फेडत होता, आता पुष्पाच्या आयुष्यात तो अंधार पसरवायला येत आहे. आता तुला 'पुष्पा इम्पॉसिबल'सोबत अधिक फॅमिली टाईम मिळेल. ही मालिका सोमवार ते शनिवार दररोज रात्री 9.35 ला सोनी सबवर प्रसारित होणार आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

चाहत्यांमध्ये मोठा उत्साह

या मालिकेतील टप्पूचा अवतार पाहून चाहत्यांना जेठालालची आठवण झाली आहे. एका चाहत्यांने व्हिडीओवर कमेंट केली आहे की,  'अरे टप्पू, तू कधी सुधरशील, जेठालाल, तुमच्या मुलाला समजावून सांगा'. दुसऱ्याने लिहिले की, 'वाह, तारक मेहताच्या आवडत्या मालिकेचा अभिनेता टप्पू येत आहे.  जुना टप्पू सर्वोत्तम आहे. भव्य गांधी सर्वोत्तम आहे'. अशा देखील चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. 

टप्पूने का सोडली 'तारक मेहता' मालिका

भव्य गांधी याने 2009 ते 2017 या कालावधीत तारक मेहता या मालिकेमध्ये टप्पूची भूमिका साकारली होती. नंतर करिअरला उंचावर नेण्यासाठी त्याने ही मालिका सोडली. आता भव्य गांधी पूर्णपणे नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. ज्याचे नाव नव्या मालिकेत प्रभास असणार आहे. निरागस आणि खोडकर प्रतिमा असलेल्या टप्पूला चाहत्यांना पाहिल्यांदाच पूर्णपणे वेगळ्या अवतारात पाहायला मिळणार आहे. 

Read More