Marathi News> मनोरंजन
Advertisement

१० वर्ष पूर्ण झाल्याने तारक मेहताच्या टीमचे दमदार सेलिब्रेशन

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेला १० वर्ष पूर्ण झाले. 

१० वर्ष पूर्ण झाल्याने तारक मेहताच्या टीमचे दमदार सेलिब्रेशन

मुंबई : तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेला १० वर्ष पूर्ण झाले. या दशकपूर्तीचा आनंद तारक मेहताच्या टीमने धूमधडाक्यात साजरा केला. तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेची सुरुवात २८ जुलै २००८ मध्ये झाली होती. तेव्हापासून हा शो न चुकता प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. त्याचबरोबर या मालिकेतील प्रत्येक भूमिकेचे खास वैशिष्ट आहे. त्याचबरोबर लीप घेऊन, कट कारस्थान करुन प्रेक्षकांना बोर करणारी ही मालिका नाही तर निख्खळ मनोरंजन करणाऱ्या या मालिकेने १० वर्षे यशस्वी केली आहेत. 

तारक मेहताच्या सेटवरुन टीमच्या सेलिब्रेशनचे फोटोज समोर आले आहेत. त्याचबरोबर मालिकेतील कलाकारांनीही या सेलिब्रेशनचे फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

काही दिवसांपूर्वीच तारक मेहताच्या टीममधील डॉक्टर हंसराज हाथींची भूमिका साकारणाऱ्या कवी कुमार आझाद यांचे निधन झाले. अचानक झालेल्या हाथींच्या एक्झिटमुळे टीमला मोठा झटका लागला होता.

पाहा टिमच्या सेलिब्रेशनचे फोटोज आणि व्हिडिओज...

 

#10year #Tmkoc #celebrate

A post shared by Dilip Joshi (@dilipjoshi_jethalal) on

 

Ap Sab ka Pyar #10yearoftmkoc

A post shared by Dilip Joshi (@dilipjoshi_jethalal) on

Read More