Marathi News> मनोरंजन
Advertisement

Chhava Teaser: विक्की कौशलच्या 'छावा' चित्रपटाचा टीझर लीक, रिलीज डेटही समोर

प्रसिद्ध अभिनेता विक्की कौशल याचा आगामी चित्रपट 'छावा'चा टीझर सोशल मीडियावर लीक झाला आहे. 

Chhava Teaser: विक्की कौशलच्या 'छावा' चित्रपटाचा टीझर लीक, रिलीज डेटही समोर

 Chhava Teaser Leak : बॉलिवूड अभिनेता विक्की कौशल अलीकडेच त्याच्या रोमँटिक आणि कॉमेडी चित्रपट 'Bad Newz'मुळे चर्चेत होता. त्याच्या या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. आता पुन्हा एकदा विक्की कौशल लोकांमध्ये खळबळ माजवण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकताच 'छावा'चा टीझर व्हायरल झाला आहे. विक्की कौशल चाहते एका वेगळ्या रुपात पाहण्यासाठी आता उत्सुक आहेत. चाहते सध्या त्याच्या आगामी 'छावा' चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वी विक्की कौशलचा चित्रपटातील पहिला लूक समोर आला होता. ज्यामध्ये अभिनेत्री छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसत होता. 

मात्र, आता प्रेक्षक या चित्रपटाची वाट पाहत असतानाच या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चित्रपटगृहात 'स्त्री' चित्रपट सुरु होण्याच्या आधी हा टीझर दाखवण्यात येतोय आहे. जो सध्या सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

पाहा टीझर

सोशल मीडियावर 'छावा' चित्रपटाचा टीझर लीक होताच प्रेक्षकांनी देखील कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अभिनेता विक्की कौशलला संभाजी महाराजांच्या लूकमध्ये आणि अभिनय पाहून चाहत्यांनी देखील त्याला पसंती दिली असून त्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. त्यासोबत 'छावा' सिनेमाचा टीझर लीक झाल्यानंतर त्यामध्ये या चित्रपटाची रिलीज डेटही बघायला मिळत आहे. या व्हायरल झालेल्या टीझरमध्ये 6 डिसेंबरला सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. विक्की कौशलसोबत या चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदाना ही येसूबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेता संतोष जुवेकर देखील या चित्रपटात विशेष भूमिकेत दिसणार आहे. 

विक्कीच्या लूकवर चाहत्यांची प्रतिक्रिया 

'छावा' चित्रपट 6 डिसेंबर 2024 ला प्रदर्शित होणार आहे. या दिवशी विक्की कौशलच्या चाहत्यांना मोठ्या पडद्यावर एक ऐतिहासिक कथा बघायला मिळणार आहे. चित्रपटाचा टीझर सध्या सोशल मीडियावर लीक झाला आहे. यामध्ये विक्कीच्या नव्या लूकबद्दल चाहते सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया देत आहेत. मोठ्या प्रमाणात चाहत्यांनी कमेंट्स देखील केल्या आहेत. एका चाहत्याने म्हटलं आहे की, अप्रतिम टीझर! हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 

Read More