Marathi News> मनोरंजन
Advertisement

सोशल मीडियावर मराठी अभिनेत्रींकडून संताप व्यक्त? म्हणाल्या, 'पटलं तर घ्या!'

ट्विटरवरचा हा ट्रेण्ड सध्या सगळीकडे धुमाकूळ घालत आहे.

सोशल मीडियावर मराठी अभिनेत्रींकडून संताप व्यक्त? म्हणाल्या, 'पटलं तर घ्या!'

मुंबई : सध्या सोशल मीडियावर #पटलंतरघ्या हा ट्रेंण्ड आहे. ट्विटरवरचा हा ट्रेण्ड सध्या सगळीकडे धुमाकूळ घालत आहे. मराठी अभिनेत्री तसचं दिग्दर्शक हा ट्रेण्ड फॉलो करताना दिसत आहेत. यामध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, सायली संजीव, तेजस्विनी पंडित, संदिप पाठक तसंच दिग्दर्शक अभिजीत पानसे यांच्याबरोबरच अजून बऱ्याच कलाकारांचा सामावेश आहे. मात्र नक्की 'पटल तर घ्या' हे प्रकरण काय आहे. हे समजलेलं नाही. 

याआधी कलाकारांनी असे अनेक कॅम्पेन प्रमोशनसाठी केले आहेत. त्यामुळे पटलं तर घ्या हा एक सिनेमा असू शकतो अशी चर्चा सध्या सगळीकडे रंगताना दिसतेय. याआधी तेजस्वीनी पंडितने बॅन लिपस्टिक हा ट्रेण्ड सोशल मीडियावर आणला होता. खरतर हा एक प्रमोशन फंडा होता.

fallbacks

अनुराधा सिरीजसाठी हा प्रमोशन फंडा वापरण्यात आला होता. यावेळी तिने 'मला लिपस्टिकचा राग येतो बॅन लिपस्टिक' असं म्हणत अभिनेत्रींनी त्यांच्या ओठांवरील लिपस्टिक फुसली होती. सेलिब्रिटींच्या या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. आता पुन्हा एकदा असाच एक ट्रेण्ड मराठी अभिनेत्रींकडून शेअर केला जात आहे.

fallbacks

 मात्र यावेळी मराठी अभिनेत्री स्वत:चे फोटो शेअर करत पटलं तर घ्या हा हॅशटॅग वापरुन स्वत:चे फोटो शेअर करत आहेत. तेजस्विनी पंडितने तिच्या ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिने #पटलंतरघ्या असं कॅप्शन दिलयं. कलाकारांच्या या फोटोवरुन आता सोशल मीडिया युजर्सही हा ट्रेण्ड फॉलो करताना दिसत आहेत. मात्र हा नवा ट्रेण्ड नेमका काय आहे? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. ही एका नव्या सिनेमाची अनाऊन्समेंन्ट आहे की आणखी काही यासाठी आपल्या आता वाट पाहावी लागणार हे मात्र नक्की.

Read More