Marathi News> मनोरंजन
Advertisement

राम कपूरचा 17 मिनिटांचा Intimate scene पाहून, काय होती पत्नीची प्रतिक्रिया ?

या सीनमुळे बरीच कोन्ट्राव्हर्सीही झाली होती. 

राम कपूरचा 17 मिनिटांचा Intimate scene पाहून, काय होती पत्नीची प्रतिक्रिया ?

Ram Kapoor Birthday: राम कपूर हे आज टेलिव्हिजन क्षेत्रातलं एक मोठं नाव आहे. दहा वर्षांपुर्वी आलेल्या बडे अच्छे लगते हैं या मालिकेमुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. आजही ही मालिका घराघरात पाहिली जाते. साक्षी तन्वर आणि राम कपूर यांचा या मालिकेतला इन्टिमेट सीन खूप गाजला होता त्याचबरोबर या सीनमुळे बरीच कोन्ट्राव्हर्सीही झाली होती. 

आज राम कपूर यांचा वाढदिवस आहे. त्यांनी आजपर्यंत अनेक नानाविध भुमिका केल्या आहेत. टेलिव्हिजन वर नव्वद आणि पुढे 2000 च्या काळात त्यांनी बऱ्याच हिंदी लोकप्रिय मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भुमिका निभावल्या आहेत. 

खरंतर त्यांनी नायकाच्या शारिरीकदृष्ट्या असणाऱ्या मागण्यांना छेद देत आपल्या परीनं स्वतःला जसे आहोत तसे फिजिकली सगळ्यांसमोर प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केला. 

स्वतःला स्लिम फिट ठेवण्यासाठी हिंदी चित्रपट जगतातील नायक तासन्तास जिममध्ये घाम गाळतात. अशा परिस्थितीत जेव्हा राम कपूर छोट्या पडद्यावर नायक म्हणून आले तेव्हा त्यांची शरीरयष्टी पाहून लोकांना धक्का बसणे स्वाभाविक होते. केवळ छोट्या पडद्यावरच नाही तर मोठ्या पडद्यावरही राम कपूरने आपल्या अभिनयाची उंची सर्वात वर ठेवली आहे

1 सप्टेंबर 1973 रोजी दिल्लीत जन्मलेल्या एकता कपूरचा शो 'बडे अच्छे लगते हैं' हा राम कपूरच्या करिअरचा टर्निंग पॉइंट होता, या शोमध्ये साक्षी तन्वरसोबतची त्यांची केमेस्ट्री प्रेक्षकांनी चांगलीच पसंत केली होती.

त्यांच्या इन्टिमेंट सीनची चर्चा...
'बडे अच्छे लगते हैं' ही मालिका हा असाच एक शो होता ज्या शोने प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. तोपर्यंत देशांतर्गत मालिकांमध्ये वेगळ्या जाणार्‍या सर्व गोष्टी या शोने छोट्या पडद्यावर दाखवल्या. या शोमध्ये राम कपूर आणि साक्षी तन्वर यांची केमिस्ट्री चांगलीच पसंत केली जात होती. एका रात्री एकता कपूरने छोट्या पडद्यावर आतापर्यंतचा सर्वाधिक चर्चेत असलेला सीन दाखवला. राम कपूर आणि साक्षी तन्वर यांच्यात चित्रित केलेल्या या लव्ह मेकिंग सीनची खूप चर्चा झाली होती. छोट्या पडद्यावर पहिल्यांदाच असा सीन चित्रित झाला होता. एखाद्या मालिकेत सलग 17 मिनिटे हे दृश्य सुरू ठेवण्याचे हे प्रथमच घडले होते. 

काय होती पत्नीची प्रतिक्रिया....
या इन्टिमेट सीनवर राम कपूर यांची पत्नी गौतमी कपूर यांनी यावर प्रतिक्रिया दिली त्या म्हणाल्या, '''मी यापूर्वी हे दृश्य पाहिले नव्हते. पण जेव्हा एवढा वाद झाला तेव्हा मला बघावे लागले आणि हो रामने मला सांगितले होते, पण मी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. कारण आपण अभिनेते आहोत. आणि प्रत्येक अभिनेत्याची स्वतःची चॉईस असते. आपण जीवनाच्या अशा टप्प्यावर आहोत जिथे या सर्व इन्सिक्यूरिट्जना आपल्याला फारसे महत्त्व द्यायचे नसते. 

Read More