Marathi News> मनोरंजन
Advertisement

बहुचर्चित सेलिब्रिटी जोडीच्या नात्यात दुरावा?

गेल्या काही दिवसांपासून... 

बहुचर्चित सेलिब्रिटी जोडीच्या नात्यात दुरावा?

मुंबई :  गेल्या काही दिवसांपासून Coronavirus कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन सुरु असतानाच सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. यातच काही सेलिब्रिटी त्यांच्या बहुविध पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांचं लक्ष वेधत आहेत. अशीच चर्चा सुरु आहे टेलिव्हिजन अभिनेता रित्विक धनजानी याच्या पोस्टची. 

मालिका अभिनय, सूत्रसंचालन अशा प्रत्येक क्षेत्रातून नावारुपास आलेल्या रित्विकच्या खासगी आयुष्याचीही तशी बरीच चर्चा. पण, या चर्चांमध्ये आता मात्र मीठाचा खडा पडल्याचं म्हटलं जात आहे. अभिनेत्री आशा नेगी हिच्यासोबत गेल्या बऱ्याच वर्षांपासून रित्विक रिलेशनशिपमध्ये आहे. पण, आता मात्र त्यांच्या या नात्यात काही गोष्टी आलबेल नसल्याचं म्हटलं जात आहे. किंबहुना सोशल मीडियावर त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांनीही जोर धरला आहे. 

fallbacks

fallbacks

 

जवळपास सहा वर्षांच्या नात्यानंतर आता या जोडीच्या काही सोशल मीडिया पोस्ट त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा आणखी बळावत आहेत. इन्स्टास्टोरीमध्ये प्रेमाशी संबंधित काही पोस्ट रित्विकने शेअर केल्या आहेत. त्यांचा सूर हा काहीतरी भलतंच दर्शवत आहे. त्याच्या या पोस्ट पाहून आता या जोडीवर नितांत प्रेम करणाऱ्यांमध्ये नाराजीही पाहायला मिळत आहे. तेव्हा आता खुद्द रित्विकच त्याच्या आणि आशाच्या नात्याबद्दल काही माहिती देणार का याकडे साऱ्यांचं लक्ष आहे. 

 

Read More