Marathi News> मनोरंजन
Advertisement

शेजारच्या घरात हत्या झाल्यामुळं अभिनेत्रीला जबर धक्का; 'एकटं राहणं म्हणजे...'

आईनं आपल्यासोबतच राहावं अशी इच्छा ती व्यक्त करताना दिसत आहे. 

शेजारच्या घरात हत्या झाल्यामुळं अभिनेत्रीला जबर धक्का; 'एकटं राहणं म्हणजे...'

मुंबई : टेलिव्हिजन अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी ही आतापर्यंत मुंबईत एकटी राहत होती. पण, आता मात्र तिला एकटं राहण्याचीही भीती वाटू लागली आहे. एकाएकी देवोलिनाला तिच्या आईची आठवण येऊ लागली आहे. आईनं आपल्यासोबत रहावं, असंच तिला वाटत आहे, यामागे एक मोठं कारण आहे. 

मुंबईसारख्या शहरात आपण कायम सुरक्षित असतो, असंच अनेकांचं म्हणणं असतं. पण, वास्तव मात्र काहीसं विचलित करणारं आहे. गगनचुंबी इमारती, ठिकठिकाणी सीसीटीव्हींची नजर आणि असंख्य लोकांची गर्दी असणाऱ्या या शहरात घडलेल्या एका घटनेनं देवोलिनाला हादरा दिला आहे. (television actress Devoleena Bhattacharjee shocking story murder)

देवोलिनाच्या इमारतीशेजारीच असणाऱ्या एका इमारतीमध्ये हाऊसकिपिंग स्टाफकडून घरकाम करणाऱ्या व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. इतकंच नव्हे, तर हत्या केल्यानंतर मृतदेहसुद्धा रेल्वे ट्रॅकवर फेकून देण्यात आल्याची खळबळजनक माहितीसुद्धा समोर आली. 

इतकं सारं घडून गेल्यानंतर देवोलिनाला आता या शहरातच भीती वाटू लागली आहे. म्हणूनच की काय आईनं आपल्यासोबतच राहावं अशी इच्छा ती व्यक्त करताना दिसत आहे. 

fallbacks

कधीकधी घाबरवते मुंबई ... 
मुंबई, हे शहर महिलांसाठी सुरक्षित आहे. पण, जेव्हा काहीजण एकटक आपल्याला पाहत राहतात तेव्हा मात्र संकोचलेपणा वाटतो, असं देवोलिना सांगते. मोठमोठ्या इमारतीतले लोक आपल्याला विचित्र नजरेनं पाहतात, कारण ती एक अभिनेत्री आहे. काही प्रमाणात या शहराबद्दलची भीती तिच्या मनातून जाण्याचं नाव घेत नसल्यामुळेच तिनं आपल्या घरात कोणा नव्या व्यक्तीचा प्रवेशही निषिद्ध ठेवला आहे. 

Read More