Marathi News> मनोरंजन
Advertisement

कोणाचीही तमा न बाळगता Nia Sharmaचं मुलीसोबतच लिपलॉक, व्हिडिओ तुफान व्हायरल

नियासोबत लिपलॉक करणारी ती कोण? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

कोणाचीही तमा न बाळगता  Nia Sharmaचं मुलीसोबतच लिपलॉक,  व्हिडिओ तुफान व्हायरल

मुंबई : टीव्ही विश्वातील सर्वात बोल्ड आणि हॉट अभिनेत्री म्हणजे निया शर्मा. 'एक हजारो में मेरी बेहना हैं' फेम निया कायम तिच्या फोटो  आणि व्हिडिओमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असणाऱ्या नियाने ऐकेकाळी सर्वांना चक्क केलं.  निया आशियातील सर्वात सेक्सी महिलाही ठरली आहे. टीव्ही सीरियलनंतर, बोल्ड सीन्स असलेल्या वेब सीरिजमध्ये तर निया शर्मा सर्व मर्यादा ओलांडल्या. याच दरम्यान नियाचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. 

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये निया सर्वांसमोर एका मुलीसोबत लिपलॉक करताना दिसली. व्हिडिओ समोर येताचं सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. नियाचा हा अंदाज पाहून चाहते थक्क झाले. होळीच्या निमित्ताने टीव्ही इंडस्ट्रीतील स्टार्सनी खूप मजा केली. होळी पार्टी दरम्यान, निया आणि 'जमाई राजा' मालिकेतील अभिनेत्री रेहाना पंडित, मीडियाशी बोलण्यासाठी एकत्र आली. तेव्हा दोघींनी लिपलॉक केलं.

निया शर्माने टेलिव्हिजनमध्ये 'काली - एक अग्निपरीक्षा' या मालिकेतून आपल्या करिअरची सुरुवात केली पण नियाला 'एक हजार में मेरी बेहना है' या मालिकेमुळे ओळख मिळाली. त्याचबरोबर निया शर्मा झी टीव्हीवरील सीरियल 'जमाई राजा' नंतर प्रसिद्ध झाली. यानंतर निया 'खतरों के खिलाडी'मध्येही दिसली.

Read More