Marathi News> मनोरंजन
Advertisement

लोकप्रिय अभिनेत्यानं रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास; पुरेशा पैशांअभावी नाही होऊ शकलं किडनी ट्रांसप्लांट

Fish Venkat Passed Away: लोकप्रिय अभिनेत्याचा करुण अंत.... सयाजी शिंदे यांच्यासोबतही केली होती स्क्रीन शेअर. दाक्षिणात्य कलाविश्वात शोककळा...   

लोकप्रिय अभिनेत्यानं रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास; पुरेशा पैशांअभावी नाही होऊ शकलं किडनी ट्रांसप्लांट

Fish Venkat Passed Away: कलाकारांच्या वाट्याला येणारी लोकप्रियता आणि प्रेक्षकांचं प्रेम हीच अनेकदा त्या कलाकारांची पुंजी असते. मात्र काही कलाकार मात्र प्रसिद्धीझोतापासून दूर गेल्यानंतर त्यांच्यापुढं आव्हानांचा इतका मोठा डोंगर उभा राहतो की, त्यापुढं हार पत्करण्यावाचून दुसरा कोणताही पर्याय उरत नाही. दाक्षिणात्य कलाजगतामध्ये कधीकाळी आपल्या भूमिकांमुळं गाजणाऱ्या एका अभिनेत्यानं जीवनात अशाच परिस्थितीचा सामना केला आणि अखेर खालावलेली प्रकृती आणि आर्थिक स्थितीनं खचलेल्या या अभिनेत्यानं रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला. 

शुक्रवारी दाक्षिणात्य चित्रपटविश्वातील एक लोकप्रिय अभिनेता अशी ओळख असणाऱ्या फिश वेंकट यांचं निधन झालं. वेंकट नाव, हे त्यांचं खरं नाव. मात्र चाहते आणि त्यांच्यावर एक कलाकार म्हणून जीवापाड प्रेम करणाऱ्यांनी त्यांना फिश वेंकट हे नाव दिलं होतं. बऱ्याच दिवसांपासून ते किडनीशी संबंधित विकारांपासून झुंज देत होते. याचदरम्यान एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचं निधन झालं. 

किडनी ट्रान्सप्लांटची गरज होती मात्र... 

फिश वेंकट यांची मुलगी श्रवंती हिनं माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार तिच्या वडिलांना लवकरात लवकर किडनी ट्रान्सप्लांटची आवश्यकता होती. मात्र वडिलांनी कलाजगतामध्ये दोन दशकांहून अधिक काळ काम करूनही या कठीण प्रसंगामध्ये मात्र त्यांना कलाजगतातून कोणीही साथ दिली नाही, अशा शब्दांत तिनं खंत व्यत्त केली. 

हेसुद्धा वाचा : नवऱ्यासोबतच चित्रपटात काम करायची 'ही' अभिनेत्री, दिले फक्त 6 चित्रपट, सर्वच सुपरहिट

 

प्राथमिक माहितीनुसार किडनी ट्रान्सप्लांटसाठी जवळपास 50 लाख रुपयांची तजवीज वेंकट कुटुंबीयांना करता आली नव्हती. दरम्यान याबाबत अधिकृत माहिती समोर येऊ शकलेली नाही. 2000 मध्ये त्यांनी 'सम्माक्का सरक्का' चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण केलं आणि ते अगदी सराईतपणे तलंगणाची भाषा बोलू शकत होते. ज्यामुळं ते थेट मासेमार समुदायाशी जोडले जात होते. याच कारणामुळं चाहत्यांनी त्यांना 'फिशरमॅन' संबोधण्यास सुरुवात केली आणि इथूनच त्यांना फिश वेंकट म्हटलं जाऊ लागलं होतं. 

Read More