मुंबई : तेलुगू चित्रपटसृष्टीतील अभिनेता राहुल रामकृष्णाने 'अर्जुन रेड्डी' या चित्रपटात अभिनेता विजय देवराकोंडा सोबत भूमिका साकारली होती. या चित्रपटाच्या माध्यमातून रातोरात स्टार झालेल्या राहुलने मंगळवारी एक धक्कादायक खुलासा केला आहे. राहुलवर लहानपणी बलात्कार झाला होता. त्याच्या या खुलाशानंतर सोशल मीडियावर सध्या तो चर्चेचा विषय झाला आहे.
I was raped during childhood.
— Rahul Ramakrishna (@eyrahul) January 20, 2020
I don’t know what else to say about my grief, except for this, because this is what I seek to know about myself.
'लहानपणी माझ्यावर बलात्कार झाला होता. त्यामुळे माझ्या दु:खाबद्दल आणखी काय सांगावं हे मला कळत नाही.' असं ट्विट करत त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. राहुलच्या या ट्विटमुळे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये खळबळ उडाली आहे. अनेकांनी राहुलला पाठिंबा देत त्याची प्रशंसा केली आहे.
राहुलची ही धक्कादायक पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. शिवाय सिनेविश्वात देखील या विषयी जोरदार चर्चा रंगत आहे. तर काहींनी त्याची प्रशंसी देखील केली आहे. राहुलने आतापर्यंत त्याचं हे दु:ख लपवत संपूर्ण लक्ष आपल्या कामावर केंद्रीत केले.
चित्रपटांमध्ये काम करण्याआधी तो एक पत्रकार म्हणून देखील काम केले होते. ‘ची ला साओ’, ‘भारत अने नेनू’, ‘जयम्मू निश्चयाम्मू रा’, ‘शीशमहल’, ‘गीता गोविंदम’ आणि ‘मिठाई’ या चित्रपटांमध्ये देखील त्याने भूमिका साकारली आहे.