Marathi News> मनोरंजन
Advertisement

अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यावर भयानक हल्ला

बिग बींच्या बंगल्यावर भीतीचं वातावरण... 

अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यावर भयानक हल्ला

मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांनी अभिनयाने सर्वांच्या मनावर राज्य केलं आहे. आज अनेक गोष्टी मोठ्या प्रमाणात  बदलल्या असल्यातरी लहान मुलं देखील बिग बींना ओळखतात. बिग बींनी फक्त त्यांच्या अभिनयामुळे चाहत्यांना आकर्षित केले नाही तर त्यांची लेखणी देखील चाहत्यांना फार काही सांगून जाते. बिग बी त्यांच्या आयुष्यात येणारे अनुभव ब्लॉगच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचवतात. फक्त प्रोफेशन नाही तर ते त्यांच्या खासगी आयुष्यबद्दल देखील अनेक गोष्टी चाहत्यांना सांगत असतात. आता बिग बींनी त्यांच्या बंगल्यात वटवाघळांच्या वावराबद्दल सांगितलं आहे. 

बिग बी लिहितात, 'सर्व गोष्टी सांगितल्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आली... ती म्हणजे वटवाघळ... खबदारी बाळगून देखील काल वटवाघळांसोबत सामना झाला... वटवाघळांपासून सुटका मिळवण्यासाठी सर्व महत्त्वाच्या गोष्टी करत आहोत. घरातील सर्वजण घाबरले आहेत... '

पुढे बिग बी लिहितात, 'मला EF ब्रिगेडच्या कोणत्याही सल्ल्याची गरज नाही...पण जर तुमच्याकडे काही नवीन असेल ज्याचा आजपर्यंत आम्ही प्रयत्न केला नसेल, तर नक्कीच आमच्याकडे आणा. आम्ही सर्वत्र धुर केला, सॅनिटाइज्ड शिंपडले...  सर्वत्र निलगिरी तेल फवारले...'

फ्रॅक्चरबद्दल दिली माहिती
याआधी अमिताभ यांनी इंस्टाग्रामवर ब्लॅक अँड व्हाईट कॉम्बिनेशन आउटफिटमधला फोटो शेअर करून त्यांचे नवीन फुटवेअर दाखवले होते. या पोस्टद्वारे त्याने सांगितले की त्याच्या पायाच्या बोटात फ्रॅक्चर आहे, ज्यामुळे त्याला ब्लॅक पेटंट लेदर शूज सोडावे लागले.

Read More