Marathi News> मनोरंजन
Advertisement

यासाठी उर्मिलाने मागीतली चाहत्यांची माफी

बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर ४ फेब्रुवारी रोजी ४५ वर्षांची झाली आहे. फार काळापासून उर्मिला मोठ्या पडद्यापासून लांब आहे. 

यासाठी उर्मिलाने मागीतली चाहत्यांची माफी

मुंबई: मोठ्या पडद्यापासून लांब असलेली अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने चाहत्यांची माफी  मागीतली आहे. ४ फेब्रुवारी रोजी उर्मिलाने तिचा वाढदिवस लंडनमध्ये साजरा केला. चाहत्यांकडून झलेल्या शुभेच्छांचा वर्षावांचे आभार मानन्यासाठी तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला. आभार मानन्यासाठी उशीर झाल्यामुळे तिने स्वत:च्या इंन्स्टाग्रामवरुन चाहत्यांची माफी मागण्यासाठी व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ उर्मिलाने लंडनच्या रोडवर शूट केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने म्हंटले आहे,' सगळ्यांना हॅलो, माफ करा....मला तुमच्या कडून मिळालेल्या शुभेच्छांसाठी आभार मानायला थोडा उशीर झाला आहे. तुमच्या सर्वांचे प्रेम प्रत्येक वर्षी मला मिळते, त्यासाठी मी तुमची आभारी आहे. नवीन वर्षाचा फेब्रुवारी महिना उगवला असला तरी मला तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत.' 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#thankyou #gratitude #love #light #smiles #sun #fun #loveuall

A post shared by Urmila Matondkar (@urmilamatondkarofficial) on

 

बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर ४ फेब्रुवारी रोजी ४५ वर्षांची झाली आहे. फार काळापासून उर्मिला मोठ्या पडद्यापासून लांब आहे. उर्मिला सोशल मीडियावर अपडेट राहून दैनंदिन जीवनातील घडामोडी तिच्या चाहत्यांना कळवत असते. नुकताच साजरा केलेल्या वाढदिवसाचे फोटो तिने इंन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#loved #blessed #gratitude #birthday #london #winter #funday #thankyou

A post shared by Urmila Matondkar (@urmilamatondkarofficial) on

 

२०१४ मध्ये पडद्यावर आलेला मराठी सिनेमा 'अजूबा' मध्ये ती चाहत्यांच्या भेटीस आली होती त्यानंतर तिने आपल्या पेक्षा दहा वर्ष लहान मॉडेल आणि उद्योगपती मोहसिन अख्तरसोबत लग्न केले.'जाकोल' मराठी सिनेमाच्या माध्यमातून तिने बालकलाकार म्हणून कलाविश्वात पदार्पण केले. 

Read More