Marathi News> मनोरंजन
Advertisement

Oscars 2020 Winners List : चार पुरस्कारांसह 'पॅरासाईट'ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर

पाहा कोण ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता 

Oscars 2020 Winners List : चार पुरस्कारांसह 'पॅरासाईट'ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर

मुंबई : 'जोकर', 'पॅरासाईट', 'वन्स अपॉन अ टाईम इन हॉलिवूड', 'लिटील वूमन', '१९१७' अशा चित्रपटांना यंदाच्या ९२व्या ऑस्कर Oscars 2020 पुरस्कारांचं नामांकन मिळालं होतं. कलाकारांची मेहनत, अभिनय कलेने गाठलेली एक वेगळी उंची आणि तंत्रज्ञानाचा वापर करत अधिक बहरलेली ही चित्रपट साकारण्याची कला नेमकी किती उंची गाठू शकते याची अनुभूती यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातून आली. अमेरिकेतील डॉल्बी थिएटर येथे पार पडलेल्या डोळे दीपवणाऱ्या या सोहळ्यात कलेचा आणि कलाकारांचा गौरव करण्यात आला. 

रंगभूषा, ध्वनी संकलनापासून छायांकन आणि दिग्दर्शनासाठीचे ऑस्कर पुरस्कार अनेक सेलिब्रिटी आणि द अकॅडमीच्या सदस्यांसमक्ष प्रदान करण्यात आले. यामध्ये '१९१७' आणि 'पॅरासाईट' या चित्रपटाने दमदार कामगिरी केल्याचं पाहायला मिळालं. दक्षिण कोरियाच्या 'पॅरासाईट' या चित्रपटाने यंदाचा ऑस्कर खऱ्या अर्थाने गाजवला. या चित्रपटाच्या दिग्दर्शकांनाचीह सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरव करण्यात आला. ९२व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात कोणत्या चित्रपटाला आणि कोणत्या कलाकाराच्या वाट्याला कोणता पुरस्कार गेला, त्याचीच ही संपूर्ण यादी.... 

Oscars2020 : ऑस्करच्या मानचिन्हाची किंमत अवघी ७० रुपये; पाहा कसं आहे हे गणित?

सर्वोत्कृष्ट चित्रपट- पॅरासाईट 

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री -  रेनी झेल्वेगरला (Judy)

सर्वोत्कृष्ट अभिनेता- जोकिन फिनिक्स (जोकर)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - बाँग जून हो यांना  (पॅरासाईट)

सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत - जोकर 

सर्वोत्कृष्ट मूळ गीत - 'आय एम गॉन अ लव्ह मी अगेन' (रॉकेटमॅन)

सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट- दक्षिण कोरिया (पॅरासाईट) 

सर्वोत्कृष्ट रंगभूषा आणि केशभूषा - बॉम्बशेल 

सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स - फोर्ड व्हर्सेस फेरारी 

सर्वोत्कृष्ट छायांकन - रॉजर डेकिन्स (१९१७)

सर्वोत्कृष्ट ध्वनी मिश्रण - १९१७

सर्वोत्कृष्ट ध्वनी संकलन - फोर्ड व्हर्सेस फेरारी 

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - लॉरा डेर्न (मॅरेज स्टोरी) 

सर्वोत्कृष्ट माहितीपट (शॉर्ट फिचर)-  लर्निंग टू स्केटबोर्ड इन अ वॉरझोन (इफ यु आर अ गर्ल) 

सर्वोत्कृष्ट माहितीपट - अमेरिकन फॅक्टरी 

सर्वोत्कृष्ट वेशभूषा - जॅकलिन दुरान (लिटील वूमन) 

सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईन - वन्स अपॉन अ टाईन इन हॉलिवूड 

सर्वोत्कृष्ट 'लाईव्ह ऍक्शन' लघुपट - द नेबर्स विंडो

सर्वोत्कृष्ट पटकथा (अडॅप्टेड) - ताइका वाईतीती (जोजो रॅबिट) 

सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा - बाँग जून हो (पॅरासाईट) 

सर्वोत्कृष्ट ऍनिमेटेड लघुपट - हेअर लव्ह 

सर्वोत्कृष्ट ऍनिमेटेड चित्रपट - टॉय स्टोरी ४ 

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - ब्रॅड पीट (वन्स अपॉन अ टाईम इन हॉलिवूड) 

वाचा : Oscars2020 : ऑस्करच्या गुडी बॅगमधील वस्तूंची किंमत ऐकून धक्काच बसेल

Read More