Marathi News> मनोरंजन
Advertisement

वयाच्या ५२व्या वर्षी अभिनेत्रीचं पाचवं लग्न

कोण आहे ही अभिनेत्री?

वयाच्या ५२व्या वर्षी अभिनेत्रीचं पाचवं लग्न

मुंबई : हॉलिवूड अभिनेत्री पामेला अँडरसन पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकली आहे. वयाच्या ५२व्या वर्षी तिने पांचव्यांदा लग्नगाठ बांधली आहे. 'बेवॉच' चित्रपटाच्या माध्यमातून प्रसिद्धीझोतात आलेल्या अँडरसनने  ‘बॅटमॅन’ चित्रपटाचा निर्माता जॉन पीटर्ससोबत लग्न गाठ बांधली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते एकमेकांना डेट करत होते. अखेर अँडरसनने वयाच्या ५२व्या वर्षी लग्न केले. 

मीडिया रिपोर्टनुसार अँडरसन आणि जॉन पीटर्स यांनी मालिबू बीचवर लग्न केले. अँडरसनही बिग बॉस या रियालिटी शोच्या चौथ्या भागात देखील झळकली होती. तर तिला आतापर्यंतच्या सर्व स्पर्धकांपैकी अधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे. 

एवढचं नाही तर तिने जॉन पीटर्ससाठी एक कविता देखील लिहिली आहे. तिने या कवितेला 'द ओरिजनल बॅण्ड बॉय ऑफ हॉलिवूड' (The Original Bad Boy Of Hollywood) असं नाव देखील दिलं आहे. 

माध्यमांसोबत संवाद साधताना तिने जॉन पीटर्स प्रती आपल्या भावना व्यक्त केल्या. ती म्हणली, 'एका कुटुंबाप्रमाणे मी जॉन पीटर्स यांच्यावर प्रेम करते.' असं म्हणत तिने आपलं प्रेम व्यक्त केलं. 

याआधी पामेलाने टॉमी ली आणि किड रॉक यांच्याशी लग्न केलं होतं. त्यानंतर पोकर खेळाडू रिक सॅलोमॉन याच्याशी तिने दोनदा लग्नगाठ बांधली होती. जॉन पीटर्स आणि अँडरसन यांच्यात तब्बल २० वर्षांचं अंतर आहे. 

Read More