Marathi News> मनोरंजन
Advertisement

न्यूड सीन देणारी अभिनेत्री पुन्हा बाथटबमध्ये दिसली टॅपलेस

चित्रपटांमध्ये बोल्ड सीन चित्रित करणं आता सामान्य झालं आहे.

न्यूड सीन देणारी अभिनेत्री पुन्हा बाथटबमध्ये दिसली टॅपलेस

मुंबई : चित्रपटांमध्ये बोल्ड सीन चित्रित करणं आता सामान्य झालं आहे. परंतु एका अभिनेत्रीला चित्रपटात न्यूड सीन देणं चांगलचं महागात पडलं आहे. न्यूड सीनमुळे तिच्यावर टीका सुद्धा करण्यात आल्या होत्या. आता ही अभिनेत्री पुन्हा चर्चेचा विषय बनली आहे. अभिनेत्री अमला पॉलने बाथटबमधील स्वत:चे न्यूड फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. 

तिने हे फोटो पोस्ट केल्यानंतर काही क्षणांतच व्हायरल झाले आहेत. तामिळ कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री अमला पॉलने 'अदाई' चित्रपटात न्यूड सीन साकारले होते. त्यामुळे तिच्या या सीनच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. 

तिच्या या भूमिकेला संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. परंतु काही लोकांनी तिच्या या सीनवर आक्षेप देखील घेतला. त्याचप्रमाणे तिच्या विरोधात आरोप देखील करण्यात आले होते. तिच अमला पुन्हा एकदा तिच्या न्यूड फोटोंमुळे चर्चेत आली आहे. 

सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिने त्या फोटोनां कॅप्शन देखील दिलं आहे. तिच्या या फोटोंवर नेटकरी प्रतिक्रिया देखील देत आहेत. ती सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सध्या ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत बालीत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

Read More