Marathi News> मनोरंजन
Advertisement

Dev Anand यांच्यावर प्रेम करणं पडलं महागात, शेवटी 'ही' अभिनेत्री राहिली अविवाहीत...

या अभिनेत्रीचे Dev Anand वर इतके प्रेम होते की आयुष्यभर राहिल्यात अविवाहित, कोण आहे ही सुप्रसिद्ध अभिनेत्री?
 

Dev Anand यांच्यावर प्रेम करणं पडलं महागात, शेवटी 'ही' अभिनेत्री राहिली अविवाहीत...

Bollywood Love Stories: बॉलिवूडमध्ये (Bollywood) आपल्या एव्हरग्रीन स्टाईलसाठी ओळखले जाणारे देव आनंद (Dev Anand) आजही लोकांच्या मनावर राज्य करतात. देव आनंद यांनी हिंदी चित्रपटांत उल्लेखनीय कामगीरी केली होती. त्यांच्याशिवाय हिंदी चित्रपटांचा इतिहास अपूर्ण आहे. त्यांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे आणि अनोख्या स्टाईलमुळे त्यांना नेहमीच सदाबहार म्हटले जायचे. बॉलिवूडचा सर्वात रोमँटिक हिरो (Romantic hero) म्हणून देव आनंद यांची आजही गणती केली जाते. ते एकेकाळी वैयक्तिक आयुष्यापासून ते व्यावसायिक आयुष्यापर्यंत नेहमीच चर्चेत असत. ते त्यांच्या प्रेमकहाणी आणि लग्नापर्यंतच्या अनेक वादांबद्दल नेहमीच चर्चेत असत. आज आम्ही तुम्हाला सांगणार  आहोत अशी एक अभिनेत्री त्यांच्या प्रेमापोटी कायम अविवाहित राहिली. 


बॉलिवूडच्या रोमँटिक हिरो

बॉलिवूडच्या रोमँटिक हिरोंच्या यादीत देव आनंदचे नाव होते. त्याचवेळी त्याची एक झलक पाहण्यासाठी मुली तासनतास वाट पाहत असत. सुरैया (Suraiya) या देखील एक आहेत. सुरैया या अशा अभिनेत्री होत्या ज्यांनी देव आनंद यांच्यावर खूप प्रेम केले. सुरैयाचे देव आनंदवर इतके प्रेम होते की त्यांनी आयुष्यभर लग्न केले नाही. 

fallbacks


सुरैया आणि देव आनंद यांचे प्रेम प्रकरण

एखाद्या अभिनेत्यासोबत नाव जोडल्यावर अभिनेत्री या नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडतात. सुरैया आणि देव आनंदचे प्रेम प्रकरण तिच्या घरी माहित झाले. मग  घरच्यांकडून त्यांच्या नात्यासाठी विरोध होऊ लागला. सुरैयाच्या आजीला देव आनंद अजिबात आवडत नव्हता. अशा परिस्थितीत आपल्या नातवाने देव आनंदसोबत लग्न करावे असे तिला वाटत नव्हते. दोघांच्या लव्हस्टोरीबद्दल बोलताना असं म्हटलं जातं की, दोघांची प्रेमकहाणी चित्रपटाच्या सेटपासून सुरू झाली होती. त्याचवेळी दोघांच्या प्रेमकथेचा शेवट खूप दुःखद झाला.


सुरैय्याची आजी देव आनंद यांच्या विरोधात

सुरैयाच्या आईची इच्छा होती की देव आनंदने सुरैयाशी लग्न करावे पण सुरैय्याची आजी देव आनंद यांच्या विरोधात होती. देव आनंद जेव्हा जेव्हा सुरैयाला फोन करायचे तेव्हा सुरैया नसून तिची आजी फोन उचलायची. तर सुरैयाच्या आजीला तिला देव आनंदसोबत काम करताना अजिबात बघायचे नव्हते.

fallbacks


देव आनंद वेगळ्या धर्माचे

सुरैयाची आजी जातीवर खूप विश्वास ठेवत होती तर देव आनंद वेगळ्या धर्माचे होते. यामुळे देव आनंद सुरैयाच्या आजीलाही पसंत नव्हता. तर सुरैया रात्रभर रडायची. सुरैयाच्या कुटुंबीयांनीही सुरैयाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर देव आनंद सुरैयापासून मजबुरीने वेगळे झाले. पण सुरैया यांनी कधीही लग्न केले नव्हते. त्या त्यांच्या प्रेमात पुर्ण आयुष्य अविवाहित राहिल्या.

Read More