Bollywood's Flop Actor : बॉलिवूड अभिनेता आणि डिस्को डान्सर अशी ओळख असणारे अभिनेते मिथुन चक्रवर्ती हे गेल्या चार दशकांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. आजही ते वेगवेगळ्या प्रोजेक्टच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटिला येतात. मिथून यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक हिट आणि फ्लॉप चित्रपट दिले आहेत. जर तुम्ही फिल्मोग्राफी पाहिली तर फ्लॉप चित्रपट देखील खूप जास्त आहेत. मिथून यांनी त्यांच्या करिअरमध्ये 250 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आणि 30 पेक्षा जास्त बॅक टू बॅक फ्लॉप चित्रपट दिले. असं असलं तरी मिथून यांना प्रोजेक्ट्स हे मिळत गेले आणि त्यांना कधीच पैशांची देखील कमी भासली नाही.
मिथून यांच्या पहिल्या चित्रपटाविषयी बोलायचं झालं तर त्यांनी 'मृगया' या चित्रपटातून मोठ्या पदार्पण केलं. या चित्रपटातून मिथून यांना नॅशनल अवॉर्ड या पुरस्कारासोबत बॉलिवूडमध्ये देखील स्थान मिळालं. त्यानंतर त्यांचं 'डिस्को डांसर' हे गाणं हिट ठरलं आणि त्यांनी करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. मिथून यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक फ्लॉप चित्रपट दिले असले तरी ते सुपरस्टार म्हणूनच ओळखले जातात. मिथुन एक अभिनेत्यासोबत राजकारणी देखील आहे. मिथुन यांनी 1989 मध्ये लागोपाठ 19 चित्रपट केले. मिथून यांचा हा रेकॉर्ड आजवर कोणी मोडू शकलो नाही.
80 च्या दशात मिथुन यांची एक वेगळी क्रेझ होती, पण 90 च्या दशकात त्यानं एकामागे एक असं फ्लॉप चित्रपटांमध्ये काम केलं. त्यामुळे त्यांच्या स्टारडमला कुठेतरी धक्का बसला. एका रिपोर्टनुसार, बॉलिवूडमध्ये सगळ्यात जास्त फ्लॉप चित्रपट देण्याचा रेकॉर्ड हा मिथून चक्रवर्ती यांच्या नावी आहे. मिथून यांच्या नंतर अभिनेता जितेंद्र यांनी सगळ्यात जास्त फ्लॉप चित्रपट दिले. मिथून यांनी तर इतके फ्लॉप चित्रपट दिले तरी सुद्धा त्यांना हार मानली नाही. मिथून यांनी त्यांच्या करिअरमध्ये 50 पेक्षा जास्त हिट चित्रपट केले. त्यात 9 ब्लॉकबस्टर आणि 9 सुपरहिट चित्रपट आहेत. मिथून यांनी फक्त बिगबजेट चित्रपट केले असं नाही तर त्यांनी छोट्या किंवा कमी बजेटच्या चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे.
हेही वाचा : ऐश्वर्यानं नकार दिलेल्या आमिरच्या 'या' चित्रपटानं पटकावले होते 12 पुरस्कार, बॉक्स ऑफिसवर केली बक्कळ कमाई
रिपोर्ट्सनुसार, मिथुन यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक चित्रपट केले. तर माहितीनुसार, मिथुन चक्रवर्ती यांची 101 कोटींची संपत्ती आहे. मिथून यांनी कार कलेक्शन इनोवा, मर्सिडीज बेंज ई क्लास, मर्सिडीज, फॉर्च्यूनर, वॉक्सवॅगनसोबत आणखी बऱ्याच गाड्या आहेत.