The Family Man 3 Actor Rohit Basfore : चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. 'फॅमिली मॅन 3' फेम अभिनेता रोहित बसफोर यांचे निधन झाले आहे. त्याचं निधन कलं झालं त्या मागचं कारण काय आहे याविषयी अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तर त्याच्या निधनानं संपूर्ण इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. रिपोर्ट्सनुसार, गरभंगा फॉरेस्ट वॉटरफॉलजवळ तो मृतवस्थेत सापडला. पोलिसांना संशय आहे याचं कारण काही दुसरंच असू शकतं. कारण तो रविवारी इथे त्याच्या मित्रांसोबत फिरायला गेला होता. तर त्याची अचानक निधनाची बातमी आल्यानंतर त्याच्या कुटुंबाला देखील मोठा धक्का बसला आहे.
‘फॅमिली मॅन 3’ या लोकप्रिय वेब सीरिजमधील त्याच्या दमदार भूमिकेसाठी रोहित ओळखला जातो. त्यांनं नुकतीच आपल्या करिअरची सुरुवात केली होती. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास घेत आहेत. रिपोर्ट्सनुसार, रोहितचं पार्थीव हे 27 एप्रिल रोजी संध्याकाळी आसामच्या गरभंगा जंगलाच्या एका धबब्याजवळ मिळालं. अधिकाऱ्यांनी लगेच तपास घेतला की त्याच्या शरिरावर कुठेच जखमा नव्हत्या.
तर ओडिशा बाइट्स या वृत्तसंस्थेनुसार, काही महिन्यांपूर्वी रोहित मुंबईहून गुवाहाटीला परत आले होते. त्याच्या कुटुंबियांनी सांगितलं की, तो रविवारी दुपारी 12:30 च्या सुमारास मित्रांसोबत जाण्यासाठी घरातून निघाला होता. पण काही काळानंतर त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तर त्याच्या एका मित्रानं कुटुंबाला संपूर्ण माहिती दिली होती. रोहित त्या अवस्थेत दिसताच त्याला रुग्णालयात घेऊन जाण्यात आले मात्र त्याचे आधीच निधन झाले होते.
पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, रोहितच्या कुटुंबियांनी आरोप केला आहे की, त्याच्या चार मित्रांनीच त्याची हत्या केली. हा एक प्लॅन्ड मर्डर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर त्यांनी हे देखील सांगितलं की रोहित नुकताच एका पार्किंग वादात सहभागी झाला होता. त्यावेळी तीन आरोपी आहेत त्यांनी कथितपणे त्याला जीवेमारण्याची धमकी दिली होती. आरोपींच्या नावाविषयी बोलायचं झालं तर रंजीत बसफोर, अशोक बसफोर आणि धरम बसफोर अशी त्यांची नावं आहेत. त्याशिवाय कुटुंबानं अमरदीप नावाच्या जिमच्या मालकावर आरोप केला, कारण त्यानं रोहितला बाहेर फिरायला जाण्यासाठी आमंत्रित केलं होतं.
हेही वाचा : आमिर खान साकारतोय गुरुनानक यांची भूमिका? 'तो अपमानास्पद...', व्हायरल पोस्टरवर टीम असं का म्हणाली?
काही दिवसांपूर्वी रोहितने ‘फॅमिली मॅन 3’च्या सेटवरून काही फोटो शेअर केले होते आणि हा अनुभव त्याच्यासाठी खूप खास होता असं त्याने सांगितलं होतं. त्याला अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या होत्या.