Marathi News> मनोरंजन
Advertisement

The Family Man 2 Trailer Out : प्रतिक्षा संपली 'द फॅमिली मॅन 2' चा ट्रेलर रिलीज

पुन्हा एकदा अनुभवता येणार मनोज वाजपेयीच्या अभिनयाची ताकद 

The Family Man 2 Trailer Out : प्रतिक्षा संपली 'द फॅमिली मॅन 2' चा ट्रेलर रिलीज

मुंबई : अभिनेता मनोज वाजपेयीच्या The Family Man या वेबसीरिजची भरपूर चर्चा झाली. या सीरिजच्या दुसऱ्या भागाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या सीरिजच्या पहिल्या सिझने प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं होतं. आता दुसरा सिझन हा 4 जून 2021 रोजी रीलिज होणार आहे. 

मनोज वाजपेयीने ही भूमिका साकारली आहे. या सीझनमध्‍ये श्रीकांत तिवारी नवीन, शक्तिशाली व क्रूर प्रतिस्‍पर्धी राजीचा सामना करणार आहे. सामंथा अक्किनेनीने राजीची भूमिका साकारली आहे. या थ्रिलर सिरीजच्‍या ९ भागांच्‍या नवीन सीझनमध्‍ये श्रीकांत मध्‍यमवर्गीय फॅमिली मॅन व जागतिक दर्जाचा गुप्‍तचर अशा दुहेरी भूमिका साकारताना आणि देशाचे घातक हल्‍ल्‍यापासून संरक्षण करण्‍याचा प्रयत्‍न करताना पाहायला मिळणार आहे. रोमांचपूर्ण ट्विस्‍ट्स आणि अनपेक्षित क्‍लायमॅक्‍स असलेल्‍या या ऍक्शन-ड्रामाने भरलेल्‍या सिरीजचा आगामी सीझन श्रीकांतच्‍या दुहेरी विश्‍वांची लक्षवेधक झलक दाखवेल. 

ट्रेलर सादरीकरणाबाबत बोलताना अमेझॉन प्राइम व्हिडिओच्‍या इंडिया ओरिजिनल्‍सच्या प्रमुख अपर्णा पुरोहित म्‍हणाल्या, ''आमची पात्रं घराघरांमध्‍ये लोकप्रिय बनत आहेत, यासारखा दुसरा आनंद कोणताच नाही. वैशिष्‍ट्यपूर्ण फॅमिली मॅन श्रीकांत तिवारीला मिळालेले प्रेम व प्रशंसा उत्तम, वास्‍तववादी कथा सर्व मर्यादांना मोडून काढण्‍याबाबत असलेल्‍या आमच्‍या विश्‍वासाला अधिक दृढ करतात. 'दि फॅमिली मॅन'चा नवीन सीझन अधिक रोमांचक, अधिक जटिल आणि अधिक ऍक्शनने भरलेला आहे. आम्‍हाला विश्‍वास आहे की, प्रेक्षक श्रीकांत आणि त्‍याच्‍या प्रतिस्‍पर्धीमधील आमना-सामना पाहण्‍यासाठी खूपच उत्‍सुक असतील. अमेझॉनमधील आम्‍हा सर्वांसाठी भारतातील, तसेच भारताबाहेरील प्रेक्षकांशी संलग्‍न होणा-या सर्वोत्तम कन्‍टेन्‍टला सादर करण्‍याचा क्षण अत्‍यंत आनंददायी आहे आणि आम्‍ही पुढील महिन्‍यामध्‍ये शोचा नवीन सीझन सादर करण्‍यासाठी खूपच उत्सुक आहोत.'' 

निर्माते राज व डीके म्‍हणाले, ''निर्माते म्‍हणून आम्‍ही आज 'दि फॅमिली मॅन'च्या बहुप्रतिक्षित सीझनचा ट्रेलर शेअर करण्‍यासाठी दीर्घकाळापासून वाट पाहत आलो आहोत. आम्‍ही खात्री देतो की, हा सीझन यंदाच्‍या उन्‍हाळ्याच्‍या शेवटपर्यंत सादर होईल. आम्‍ही आमचे वचन नेहमीच पाळले आहे, ज्‍याचा आम्‍हाला आनंद होत आहे. हा प्रतिक्षाकाळ अखेर 4 जून रोजी समाप्‍त होईल. श्रीकांत तिवारी थरारक पटकथेसह परतत आहे आणि 'नवीन चेह-याच्‍या रूपात धोका येत आहे' – सामंथा अक्किनेनी, जिने उत्तम कामगिरी बजावली आहे. सोबतच प्रतिभावान कलाकार देखील आहेत. आम्‍हाला विश्‍वास आहे की, महामारीदरम्‍यान काम करावे लागले असले तरी आम्‍ही तुम्‍हा सर्वांसाठी रोमांचक सीझनची निर्मिती केली आहे. आशा करतो की, नवीन सीझन अद्वितीय ठरेल. हा अत्‍यंत अवघड काळ आहे आणि आम्‍ही लवकरच सर्वकाही सुरळीत होईल अशी आशा व्‍यक्‍त करण्‍यासोबत प्रार्थना करतो. कृपया सुरक्षित राहा, मास्‍क घला आणि लवकरात लवकर लस घ्‍या.''  

पुरस्‍कार-प्राप्‍त अमेझॉन ओरिजिनल सिरीजमध्‍ये दक्षिणेची सुपरस्‍टार सामंथा अक्किनेनीचे डिजिटल पदार्पण होत आहे. या सिरीजमध्‍ये प्रतिभावान कलाकार देखील आहेत जसे पद्मश्री पुरस्‍कार-प्राप्‍त मनोज वाजपेयी, प्रियामणी, यांच्यासोबत शरिब हाश्‍मी, सीमा बिस्‍वास, दर्शन कुमार, शरद केळकर, सनी हिंदुजा, श्रेया धन्‍वंतरी, शाहब अली, वेदांत सिन्‍हा आणि महक ठाकूर यांसारखे प्रतिभावान कलाकार आहेत. या सोबतच तमिळ चित्रपटसृष्‍टीमधील नावाजलेले मिमे गोपी, रविंद्र विजय, देवदर्शिनी चेतन, आनंद सामी आणि एन. अलगमपेरूमल देखील असणार आहेत.

Read More