Marathi News> मनोरंजन
Advertisement

रक्तबंबाळ अवस्थेत परिणीती मन हेलावतेय

परिणीती स्वत:चे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

रक्तबंबाळ अवस्थेत परिणीती मन हेलावतेय

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. परिणीती स्वत:चे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. बुधवारी तिने आपल्या आगामी 'द गर्ल ऑन द ट्रेन' चित्रपटाचा फर्स्ट लूक जारी केला आहे. तिचा हा लूक चांगलाच व्हायरल होत आहे. चित्रपटाच्या फर्स्ट लूकमध्ये ती फार रक्तबंबाळ अवस्थेत दिसत आहे. 

बाथटबमध्ये बसलेल्या परिणितीच्या डोक्यावर गंभीर इजा झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे परिणीतीचा हा जखमी लूक व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांच्या मनात चित्रपटाविषयीची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. 

चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर करत, परिणीति कॅप्शनमध्ये लिहिते की ,'काही असं जे मी यापूर्वी कधीही केलं नाही. ही माझी आतापर्यंतची सर्वात कठीण भूमिका आहे.' 'द गर्ल ऑन द ट्रेन' चित्रपटामध्ये परिणिती मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

तिच्या शिवाय चित्रपटामध्ये अभिनेत्री कृती कुल्हारी आणि अदिती राव हैदरी सुद्धा भूमिका साकारताना दिसणार आहेत. कृती चित्रपटामध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या व्यक्तिरेखेला न्याय देताना दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन रिभू दासगुप्तास करणार आहेत.

Read More