Marathi News> मनोरंजन
Advertisement

कतरिनाच्या आयुष्यातील 'ती' घटना, तिने घेतला बॉलिवूड सोडण्याचा निर्णय...

रुपेरी पडद्यावरचं एक प्रसिद्ध नाव म्हणजे अभिनेत्री कतरिना कैफ... पण एक वेळ अशी होती जेव्हा....   

कतरिनाच्या आयुष्यातील 'ती' घटना, तिने घेतला बॉलिवूड सोडण्याचा निर्णय...

मुंबई : रुपेरी पडद्यावरचं एक प्रसिद्ध नाव म्हणजे अभिनेत्री कतरिना कैफ... आज कतरिना यशाच्या उच्च शिखरावर जरी असली, तरी तिच्या फिल्मी करियरमध्ये अनेक चढ-उतार आले... एक वेळ अशी आली, जेव्हा तिने बॉलिवूड सोडण्याचा निर्णय... कतरिनाने आजपर्यंत अनेक सिनेमांमध्ये काम केलं. पण सुरूवातीला तिचे सिनेमे प्रेश्रकांचं मनोरंजन करण्यास अयशस्वी ठरले. पण एका अभिनेत्याच्या साथीमुळे कतरिनाच्या करियरला नवी कलाटणी मिळाली... 

कतरिनाचं करियर 'नमस्ते लंडन' सिनेमानंतर मार्गावर आलं. नमस्ते लंडन' सिनेमाच्या स्क्रिनिंगला उपस्थित राहिल्यानंतर कतरिनाला वाटलं की,  हा सिनेमा देखील फ्लॉप होणार आहे. त्यानंतर त्याने फिल्मी जग सोडण्याचा विचार केला. 

fallbacks

करण जोहरच्या कॉफी विथ करण चॅट शोमध्ये कतरिनाने याचा खुलासा केला. पण रिलीज होताच या सिनेमाने कतरिनाचं नशीब चमकवलं. अक्षय आणि कतरिनाचा सिनेमा जबरदस्त हिट झाला आणि तिला बड्या दिग्दर्शकांचे फोन येऊ लागले.

'नमस्ते लंडन' सिनेमात अक्षय कुमार आणि कतरिना कैफच्या जोडीला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं, सिनेमातील डायलॉगपासून ते प्रत्येक गाणे खूप गाजले. आज कतरिना बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. 

Read More