Marathi News> मनोरंजन
Advertisement

फोटोत दिसणारा हा निरागस मुलगा आज आहे बॉलिवूडचा सुपरस्टार, तुम्ही ओळखलत का?

 तुमच्या बालपणीचे फोटो शेअर करणं हा सध्या सोशल मीडियावरील ट्रेंड बनला आहे. 

फोटोत दिसणारा हा निरागस मुलगा आज आहे बॉलिवूडचा सुपरस्टार, तुम्ही ओळखलत का?

मुंबई : तुमच्या बालपणीचे फोटो शेअर करणं हा सध्या सोशल मीडियावरील ट्रेंड बनला आहे. बॉलीवूडचे स्टार्स असोत किंवा सामान्य लोकं, सगळेच आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत असतात. त्याचबरोबर बॉलिवूड सेलिब्रिटींचे फोटोही हळूहळू समोर येत आहेत. करीना कपूरपासून ते प्रियांका चोप्रापर्यंत सगळेच स्टार्सच्या बालपणीचे फोटो पाहायला मिळाले आहेत. दरम्यान, बॉलिवूडपासून ते दक्षिणेपर्यंत इंडस्ट्रीत काम करणारा आणखी एक अभिनेत्याचा बालपणीचा फोटो समोर आला आहे.

हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून लॉकडाऊनच्या काळात त्याने अनेकांना मदत केली आहे. जो अडचणीच्या काळात सर्वसामान्यांचा आधार बनला आहे. होय, लाखो हृदयांवर राज्य करणारा हा अभिनेता म्हणजे सोनू सूद. सोनू सूद आज मसिहा बनला आहे. हा फोटो त्याच्या लहानपणाचा आहे, ज्यामध्ये तो किती निरागस दिसतोय हे तुम्हीच पाहू शकता.

दुसरीकडे, त्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्याने 'किसान' चित्रपट साइन केला आहे. याशिवाय तो 'पृथ्वीराज'मध्येही दिसणार आहे. नुकताच सोनू सूदचा 'साथ क्या निभाओगे'चा एक म्युझिक व्हिडिओही रिलीज झाला आहे. ज्यावर चाहत्यांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला होता.

Read More