Marathi News> मनोरंजन
Advertisement

कपिलच्या फॅन्ससाठी खुशखबर, लवकरच पुनरागम

 नैराश्याने त्रस्त असलेला कपिल शर्मा पुन्हा एकदा मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करतोय.

कपिलच्या फॅन्ससाठी खुशखबर, लवकरच पुनरागम

नवी दिल्ली : छोट्या पडद्यावरुन मोठा काळ गायब असलेला कपिल पुन्हा एकदा हसविण्यासाठी येतोयं. यावेळेस कपिल कोणता नवा शो नाही तर आपलाच जुना 'द कपिल शर्मा शो' पुन्हा घेऊन येतोय. कपिल शर्माने आपला आनंद सोशल मीडियावर शेअर केलायं. 'मी लवकरच परत येतोय, द कपिल शर्मा शो घेऊन...तुमच्यासाठी..फक्त सोनी टीव्ही वर. टाटा स्काय सबस्क्राइबर्सना सोनी टीव्हीवर वेगळा खर्च न करता हा शो पाहता येणार आहे.

आपल्या शानदार कॉमेडीच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या कपिलने याआधीही सोशल मीडियावर पुनरागमन करण्याचा उल्लेख केला होता. मी आज देखील फॅन्ससाठी फ्रेश असल्याचे त्याने लाईव्ह चॅट शो मध्ये म्हटलं होतं.

घेतोय अक्षयची मदत 

 नैराश्याने त्रस्त असलेला कपिल शर्मा पुन्हा एकदा मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करतोय. आपल्या कॉमिक पर्सनालिटीने सर्वांना हसवून लोटपोट करणारा कपिल पुन्हा एका घराघरात दिसणार आहे. कपिल शर्माला नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी अक्षय कुमार मदत करतोय असं सांगितलं जातंय. कपिल शर्मा या फेजमधून बाहेर पडण्यासाठी खिलाडी अक्षय कुमारच्या कामातून प्रेरणा घेतोय.

Read More