Marathi News> मनोरंजन
Advertisement

कपिल शर्मा एका एपिसोडचे आकारतो एवढे मानधन

काय आहे प्रकरण? 

कपिल शर्मा एका एपिसोडचे आकारतो एवढे मानधन

मुंबई : कपिल शर्मा लवकरच बाबा होणार आहे. नुकतेच त्याने पत्नी गिन्नी चतरथचे बेबी शॉवर पार्टीचे फोटो शेअर केले आहे. कपिल शर्मा आपला शो 'द कपिल शर्मा कॉमेडी शो'मुळे कायम चर्चेत असतो. नुकतेच उदित नारायण कपिल शर्माच्या शोमध्ये आले होते. त्यांच्यासोबत मुलगा आदित्य नारायण देखील होता. यावेळी उदित नारायण यांनी कपिल शर्मा शुटिंगकरता एका एपिसोडचे किती मानधन घेतो? हे सांगितलं आहे. 

जर तुम्ही रोज कपिल शर्माचा एपिसोड बघत असाल. तर तुम्हाला माहित आहे तो सगळ्या कलाकारांचे मानधन विचारत असतो. प्रत्येकजण या प्रश्नाकडे हसण्यावारी दुर्लक्ष करतो. मात्र उदित नारायण यांनी कपिल शर्मा एका एपिसोड करता किती रुपये आकारतात याचा खुलासा केला आहे. 

उदित नारायण म्हणाले की, कपिल शर्मा एका एपिसोडकरता 1 करोड रुपये आकारतो. उदित नारायण शोमध्ये कपिल शर्माला त्याच्या फीवरून चिढवायला लागतात. तसेच त्यांनी कपिलच्या स्ट्रगलिंगच्या काळातील रोचक किस्से देखील सांगितले. कपिल खरंच एका एपिसोडकरता 1 करोड रुपये आकारतो की नाही हे माहित नाही. पण आता ही चर्चा रंगली आहे. 

कार्यक्रमात आदित्य नारायणने आपल्या पालकांबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. उदित नारायण यांच्या लव लाइफबद्दल देखील कार्यक्रमातून प्रेक्षकांना कळलं. उदित नारायण यांची पत्नी दीपा या एअर होस्टेस होती. दीपा यांच्याशी लग्न करण्यासाठी भरपूर मेहनत करावी लागली. 

Read More