Marathi News> मनोरंजन
Advertisement

अभिनेता पुष्कर जोग कोणाला म्हणतोय 'खोटारडी'?

अभिनेता पुष्कर जोग जितका चर्चेत त्याच्या कामामुळे असतो तितकाच चर्चेत अभिनेता त्याच्या पर्सनल लाईफमुळे असतो. 

अभिनेता पुष्कर जोग कोणाला म्हणतोय 'खोटारडी'?

मुंबई : एकविरा म्युझिक प्रस्तुत 'विश्वामित्र' या अल्बममधील तीन गाणी प्रदर्शित झाल्यानंतर आता अखेरचे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 'विश्वामित्र', 'तुझ्याविना' आणि `दूर दूर' या तीनही गाण्यांना संगीतप्रेमींचा भरभरून प्रतिसाद मिळाल्यानंतर आता या अल्बममधील 'खोटारडी' हे तुटलेल्या हृदयाची कहाणी सांगणारे गाणे प्रदर्शित झाले आहे. अवधूत गुप्ते यांनी शब्दबद्ध, संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला आवाजही त्यांचाच लाभला आहे. पुष्कर जोग, पूर्णिमा डे, चैत्राली घुले आणि अवधूत गुप्ते यांच्यावर चित्रित झालेले हे रेट्रो साँग नॉस्टॅल्जिक फील देतेय. 

अवधूत गुप्ते यांच्या 'विश्वामित्र' या अल्बममधील 'विश्वामित्र', 'तुझ्या विना'नंतर `दूर दूर' या श्रवणीय गाण्यांनंतर आता हे चौथं आणि अखेरचे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.  या गाण्याचा जबरदस्त टिझर काही दिवसांपुर्वी सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला होता.  अवधूत गुप्ते यांचं संगीत, बोल असलेल्या 'खोटारडी'  या गाण्याला आवाजही त्यांचाच लाभला आहे. प्रेमात पडलेल्या प्रत्येकालाच आजूबाजूला 'त्या' खास व्यक्तीचा भास होतो. परंतु कधी कधी 'त्या' व्यक्तीला विसरण्याचा प्रयत्न केला तरी सर्वत्र तीच व्यक्ती दिसते. प्रेमातील हीच तळमळ या गाण्यातून व्यक्त होत आहे. अवधूत गुप्ते यांची खासियत या गाण्यातून दिसत असून उडत्या चालीचे हे गाणे सगळ्यांनाच आवडेल असे आहे. याचे सादरीकरणही उल्लेखनीय आहे. एकविरा म्युझिक  प्रस्तुत ‘विश्वामित्र’ या अल्बमची निर्मिती गिरीजा गुप्ते यांनी असून येत्या १५ फेब्रुवारीला ''खोटारडी' गाणे प्रदर्शित झालं आहे.

या गाण्याबद्दल अवधूत गुप्ते म्हणतात, " प्रेमात दुरावा आला की प्रत्येकाची नाती तुटतात. प्रेमात दुरावा येण्याची प्रत्येकाची करणे वेगवेगळी असतात. `खोटारडी`या गाण्यातूनही तुटलेल्या हृदयाची एक नवीन गोष्ट भेटीला येणार आहे. 'विश्वामित्र' अल्बममधील हे अखेरचे गाणे असून मला हृदय तुटलेला प्रत्येक जण  हे गाणे स्वतःशी जोडण्याचा प्रयत्न करेल. ज्याप्रमाणे प्रेक्षकांनी आधीच्या गाण्यावर प्रेम केले तसेच प्रेम या गाण्यावरही करतील. या गाण्याचा बाज वेगळा आहे, लूक वेगळा आहे. चारही गाण्यांची संकल्पना एक असली तरीही चारही गाणी वेगळ्या धाटणीची होती. प्रेक्षकांच्या मिळणाऱ्या प्रतिसादामुळेच अशी कलाकृती सादर करण्याची स्फूर्ती मिळते.''

Read More