Marathi News> मनोरंजन
Advertisement

Ghar Banduk Biryani: 'घर बंदूक बिर्रयानी'मधील मोस्ट वॉन्टेड गुंड गँग आली समोर

 'घर बंदूक बिरयानी' चित्रपटातील सयाजी शिंदे, नागराज मंजुळे, आकाश ठोसर आणि सायली पाटील हे प्रमुख कलाकार सर्वांसमोर आल्यानंतर आता  चित्रपटातील मोस्ट वॉन्टेड 'डाकू गँग' समोर आली आहे.

Ghar Banduk Biryani: 'घर बंदूक बिर्रयानी'मधील मोस्ट वॉन्टेड गुंड गँग आली समोर

मुंबई : बहुप्रतीक्षित 'घर बंदूक बिरयानी' या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. चित्रपटाचे टीझरच इतके उत्कंठा वाढवणारे होते, की आता प्रेक्षक या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहात आहेत. झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे प्रस्तुत, हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित 'घर बंदूक बिरयानी' चित्रपटातील सयाजी शिंदे, नागराज मंजुळे, आकाश ठोसर आणि सायली पाटील हे प्रमुख कलाकार सर्वांसमोर आल्यानंतर आता  चित्रपटातील मोस्ट वॉन्टेड 'डाकू गँग' समोर आली आहे. सोशल मीडियावर या 'डाकू गँग'चे पोस्टर्स प्रदर्शित झाले आहेत. 

या गॅंगमध्ये श्वेतांबरी घुडे, विठ्ठल काळे, नीरज जमगाडे- मायकल, सोमनाथ अवघडे, संतोष  व्हडगीर (नाईक ), ललित मटाले, प्रवीण डाळिंबकर, किरण ठोके, सुरज पवार, किशोर निलेवाडी, प्रियांशू छेत्री- बाबू , सुभाष कांबळे, गिरीश कोरवी, चरण जाधव, अशोक कानगुडे, आशिष खाचणे यांचा समावेश आहे. या डाकू गँगची  सुनावणी येत्या ७ एप्रिलला जवळच्या चित्रपटगृहात होणार आहे.

या 'डाकू गँग'च्या झळकलेल्या पोस्टरवर त्यांनी ॲक्टिंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता सुनावणीदरम्यान काय निकाल लागणार, याकडे आता प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. 

या कलाकारांबद्दल नागराज मंजुळे म्हणाले, 'या सगळ्या कलाकारांचं काम मी पाहिलं आहे. काहींसोबत काम केलं आहे. हे सगळेच कलाकार खूप मेहनती आहेत. सर्वांनीच खूप चांगलं काम केलं आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील हे कलाकार असल्याने प्रत्येकाची एक वेगळी शैली आहे. त्यामुळे त्यांचा अभिनय हा अधिक नैसर्गिक वाटतो.'झी स्टुडिओजने त्यांच्या इस्टाग्रामवरुन ही पोस्ट शेअर करत महिती दिली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नुकताच 'घर बंदूक बिरयानी'चा भव्य म्युझिक लाँच दिमाखदार सोहळा पार पडला. यावेळी दिग्दर्शक हेमंत जंगल अवताडे, नागराज पोपटराव मंजुळे, सयाजी शिंदे आकाश ठोसर, सायली पाटील, संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र, गीतकार वैभव देशमुख, झी स्टुडिओजचे मंगेश कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Read More