Marathi News> मनोरंजन
Advertisement

'मेरे हसबँड की बीवी' हे नाव झी मराठीवरील 'या' मालिकेतून सुचले; भूमी पेडणेकरचा मोठा खुलासा

Mere Husband Ki Biwi Movie:'मेरे हसबँड की बीवी' या चित्रपटाचे नाव या झी मराठीवरील मालिकेवरून सुचले. भूमी पेडणेकरने केला मोठा खुलासा पाहूयात सविस्तर.

'मेरे हसबँड की बीवी' हे नाव झी मराठीवरील 'या' मालिकेतून सुचले; भूमी पेडणेकरचा मोठा खुलासा

Mere Husband Ki Biwi Movie: अर्जुन कपूर, भूमी पेडणेकर आणि रकुल प्रीत सिंग यांचा रोमँटिक-कॉमेडी चित्रपट 'मेरे हसबँड की बीवी' 21 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन मुदस्सर अझीझ यांनी केले आहे. भूमी पेडणेकरने एका मुलाखतीत खुलासा केला की, या चित्रपटाचे शीर्षक 'झी मराठी'वरील लोकप्रिय मराठी मालिका 'माझ्या नवऱ्याची बायको' वरून घेतले  होते.

भूमी पेडणेकरने सांगितले की, 'चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर अनेक प्रेक्षकांना 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेची आठवण झाली. हे शीर्षक दिग्दर्शक मुदस्सर अझीझ यांच्या मनात 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेवरूनच आलं होतं. मुदस्सर हे मराठी भाषेचे चांगले जाणकार आहेत आणि त्यांनी ही मालिका पाहिली होती.' 

fallbacks

चित्रपटाची कथा
'मेरे हसबँड की बीवी' या चित्रपटामध्ये अर्जुन कपूर आणि भूमी पेडणेकर यांचा घटस्फोट होतो. त्यानंतर रकुल प्रीत सिंग अर्जुनच्या आयुष्यात येते, पण त्यानंतर भूमी पुन्हा एकदा त्याच्या आयुष्यात प्रवेश करते. चित्रपटातील या गोंधळलेल्या आणि मनोरंजक गोष्टींमुळे प्रेक्षकांना भरपूर हसवले आहे. 

चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान भूमी पेडणेकर तिच्या या भूमिकेविषयी उत्साही होती आणि तीने या चित्रपटाविषयी अनेक गोष्टी आपल्या चाहत्यांना सांगितल्या. ती म्हणाली, 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेसारखंच चित्रपटाचे नाव असावं असा विचार दिग्दर्शकांचा डोक्यात आला होता. हे फक्त एक साधे शीर्षक नाही, तर चित्रपटाच्या कथानकाला एक वेगळी दिशा देणारा एक महत्त्वाचा घटक आहे.'

हे ही वाचा: 13 वर्ष डेटिंग, ती इन्फ्लुएन्सर अन् तो वकील; अशी आहे प्राजक्ता आणि वृषांकची लव्ह स्टोरी

चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर कमाई

'मेरे हसबँड की बीवी' ने सुरुवातीच्या आठवड्यात अपेक्षित यश मिळवले नाही. विकी कौशलच्या 'छावा' या चित्रपटामुळे आणि इतर नवीन चित्रपटांच्या रिलीजमुळे या चित्रपटाला थोडी कठीण स्पर्धेला तोंड द्यावे लागले. परंतु 'मेरे हसबँड की बीवी' ने चौथ्या दिवशी 51 लाखांची कमाई केली आहे. सध्याच्या घडीला, या चित्रपटाने एकूण 4.82 कोटी रुपये कमावले आहेत. त्यामुळे चित्रपटाच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. 

चित्रपटाच्या अपेक्षेपेक्षा कमी कमाईतून स्पष्ट होत आहे की, प्रेक्षकांच्या पसंतीसाठी अजून मेहनत घ्यावी लागेल. याव्यतिरिक्त या चित्रपटाची कथा आणि संकल्पनेबद्दल चर्चाही जास्त होण्याची अपेक्षा आहे.

Read More