Marathi News> मनोरंजन
Advertisement

करिश्मा- अभिषेकचं नातं संपण्यामागचं खरं कारण समोर; अमिताभ बच्चन म्हणाले, 'वेगळं होणं कधी कधी योग्यच असतं'

karishma- abhishek engagment: 2002मध्ये अमिताभ बच्चन यांच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन यांचा साखरपुडा पार पडला होता. परंतु काही महिन्यांतच हे नातं तुटलं. यामागचं खरं कारण अनेक वर्षं गुलदस्त्यात होतं. मात्र एका मुलाखतीत अमिताभ बच्चन यांनी या नात्याबद्दल पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले.

करिश्मा- अभिषेकचं नातं संपण्यामागचं खरं कारण समोर; अमिताभ बच्चन म्हणाले, 'वेगळं होणं कधी कधी योग्यच असतं'

Karisma Kapoor And Abhishek Bachchan Breakup: करिश्मा कपूरचे विवाहसोहळा 2003 मध्ये उद्योगपती संजय कपूरशी मुंबईतील कृष्णा राज बंगल्यात पार पडला. हे लग्न अरेंज्ड मॅरेज होतं. पण करिश्माचे वडील रणधीर कपूर यांना हे नातं मान्य नव्हतं. काही वैयक्तिक कारणांमुळे 11 वर्षांनी करिश्मा- संजयनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि 2016 मध्ये घटस्फोट घेतला. सध्या करिश्मा आपल्या आई आणि दोन मुलांसह राहते.

संजय कपूरशी लग्न होण्यापूर्वी करिश्माचं नाव अभिषेक बच्चनसोबत जोडलं गेलं होतं. त्यांचा साखरपुडा मोठ्या जल्लोषात पार पडला होता. मात्र, अचानक हे नातं संपुष्टात आलं आणि कोणीच यावर भाष्य केलं नव्हतं.

कॉफी विथ करणमध्ये खुलासा
2005 मध्ये करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' शोमध्ये अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन सहभागी झाले होते. यावेळी अमिताभ यांनी या ब्रेकअपवर पहिल्यांदाच मत व्यक्त करत म्हणाले, 'नातेसंबंध जोडणं किंवा तुटणं हे फारच नाजूक क्षण असतात. जर परिस्थिती योग्य नसेल तर वेगळं होणंच योग्य ठरतं.' ते पुढे म्हणाले, 'अशा अनुभवांमुळे माणूस अधिक परिपक्व होतो.'

जीवनातील धडे
अमिताभ यांनी स्पष्ट केलं की अशा प्रसंगांमधून माणूस स्वतःला अधिक मजबूत बनायला शिकतो. त्यांनी हेही नमूद केलं की हे धडे, विशेषतः चित्रपटसृष्टीसारख्या क्षेत्रात, फार महत्त्वाचे ठरतात. त्यांनी आपले वडील हरिवंश राय बच्चन यांचं एक वाक्यही सांगितलं, 'जर काही तुमच्या मनासारखं झालं, तर ते चांगलं आणि जर तसं नाही झालं, तर ते अजूनच चांगलं. कारण ते देवाच्या इच्छेने होतं.'

हे ही वाचा: 'सितारे जमीन पर'च्या स्क्रीनिंगमध्ये आमिर खान गर्लफ्रेंड गौरीसोबत झाला रोमँटिक; सलमान खानच्या उपस्थितीने वाढली शोभा

करिश्मा आणि अभिषेक एकत्र किती काळ होते?
वृत्तांनुसार, करिश्मा आणि अभिषेक जवळपास पाच वर्षं एकत्र होते. त्यांचा साखरपुडा झाल्यानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. करिश्मा बच्चन कुटुंबाचा भाग होण्यासाठी उत्सुक होती. पण काही महिन्यांतच हे नातं संपलं.

अनेक चर्चांनंतरही कारण स्पष्ट नव्हतं
त्यावेळी माध्यमांमध्ये अनेक अफवा आणि तर्कवितर्क झाले. काही अहवालांनुसार करिश्मा कपूरची आई बबिता यांनी लग्नाच्या आधी काही अटी घातल्या होत्या, जसं की अभिषेकच्या नावे काही मालमत्ता असावी. या अटी बच्चन कुटुंबाला मान्य नव्हत्या. मात्र याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही. शेवटी हे मतभेदच दोघांच्या ब्रेकअपचं कारण ठरले. नंतर करिश्माने उद्योगपती संजय कपूरसोबत संसार थाटला, जो पुढे फार काळ टिकला नाही.

Read More