Marathi News> मनोरंजन
Advertisement

अभिनेत्रीने राहुल महाजनला खरोखर मारलं का?

याबाबत आता खुलासा करण्यात आला आहे.

अभिनेत्रीने राहुल महाजनला खरोखर मारलं का?

मुंबई : डान्स रिअॅलिटी शो 'नच बलिये ९' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या डान्स शोमध्ये टेलिव्हिजनवरील अनेक कलाकार सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाच्यानिमित्ताने भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचा मुलगा राहुल महाजन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 'नच बलिये'च्या सेटवर एका अभिनेत्रीने राहुलला कानाखाली मारल्याची जोरदार चर्चा आहे. 

'नच बलिये ९'मध्ये अभिनेत्री श्रेनु पारिख आणि राहुल महाजन गेस्ट कपल म्हणून प्रीमियरच्या दिवशी उपस्थित राहणार आहेत. प्रीमियरमध्ये श्रेनु पारिख आणि राहुल महाजन एकत्र डान्स करतानाही दिसणार आहेत.

मात्र, 'नच बलिये ९'च्या प्रीमियरसाठी सराव करत असताना, श्रेनु पारिखने राहुल महाजनच्या कानाखाली मारल्याची बातमी सर्वत्र पसरली. मात्र या चर्चेनंतर याबाबत खुलासा करण्यात आला आहे. 

राहुल आणि श्रेनु 'सेकंड हॅन्ड जवानी' या गाण्यावर सराव करत होते. या डान्समध्ये कॉमेडी सीन दाखवण्यासाठी श्रेनुला राहुल महाजनच्या कानाखाली मारायची होती.

पण श्रेनुला राहुलच्या कानाखाली मारण्यास संकोच वाटत होता. त्यावेळी राहुलनेच श्रेनुला संकोच न करता मारण्यास सांगितलं आणि त्यांच्या डान्सचा एक भाग म्हणून श्रेनुने राहुलच्या कानाखाली मारली. 

त्यामुळे केवळ त्यांच्या गाण्यातील अभिनयासाठी कानाखाली मारण्याचा खुलासा करण्यात आला आहे.

बॉलिवूड दबंग खान सलमानने 'नच बलिये ९' ची निर्मिती केली आहे. शोमध्ये कपलशिवाय एक्स कपलही सहभागी होणार आहेत. त्यामुळे यंदाचं 'नच बलिये'चं ९वं पर्व पाहणं मजेशीर ठरणार आहे. 

Read More