Marathi News> मनोरंजन
Advertisement

गणेश गायतोंडे पुन्हा येतोय...

'सेक्रेड गेम्स'च्या दुसऱ्या भागासाठी चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता

गणेश गायतोंडे पुन्हा येतोय...

प्रेरणा कोरगांवकर, झी मीडिया, मुंबई : सेक्रेड गेम्स वेबसीरिजने तमाम प्रेक्षकांना भुरळ घातली. अनुराग कश्यपने दिग्दर्शित केलेल्या आणि विक्रम मोटवाने लिखित 'सेक्रेड गेम्स' या वेबसिरीजचा दुसरा भाग बुधवारी मध्यरात्री १२ वाजता प्रदर्शित होणार आहे. या सीरीजसाठी चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. 

पहिल्या भागात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा गॅंगस्टर अंदाज आणि खाकी वर्दीतला सैफ अली खान या दोघांचाही दमदार अभिनय प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेला. राधिका आपटेच्या भूमिकेलाही चांगलाच प्रतिसाद मिळाला. सगळ्यांचाच उत्तम अभिनय आणि खिळवून ठेवणारं रंजक कथानक हे या वेब सिरीजचं प्रमुख आकर्षण ठरलं. पहिल्या भागाच्या तुफान यशानंतर आणि लोकप्रियतेनंतर चाहत्यांची सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या भागासाठीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

 
 
 
 

A post shared by Netflix India (@netflix_in) on

दुसऱ्या भागाचा ट्रेलर प्रदर्शित होताच या ट्रेलरलाही जबरदस्त प्रतिसाद मिळाला. अवघ्या काही दिवसांत या ट्रेलरला १ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले. त्यानंतर नेटफ्लिक्सकडून दुसऱ्या भागातील कलाकरांचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला.

 
 
 
 

A post shared by Netflix India (@netflix_in) on

दुसऱ्या भागात अभिनेता पंकज त्रिपाठीची गुरुजी ही भूमिका चाहत्यांच्या उत्सुकतेत आणखीन भर घालणारी ठरतेय. तर अभिनेत्री कल्की केक्लाच्या भूमिकेविषयीही प्रचंड उत्सुकता आहे.

 
 
 
 

A post shared by Netflix India (@netflix_in) on

सरताज एका मोठ्या कटाचा पर्दाफाश कसा करणार? गणेश गायतोंडेला प्रेक्षक पुन्हा एकदा डोक्यावर उचलून घेणार का? हे पाहणं औस्तुक्याचं ठरणार आहे. 

Read More