Marathi News> मनोरंजन
Advertisement

Met Gala मध्ये 'या' तीन पदार्थांवर आहे बंदी; यंदाच्या मेट गालाचा मेन्यू बघून थक्क व्हाल!

Met Gala 2024: अलीकडेच आलिया भट्टने मेट गाला या कार्यक्रमात हजेरी लावली होती. तिच्या या लूकची चांगलीच चर्चा रंगली होती. मेट गाला या इव्हेंटविषयी अधिक जाणून घेऊया.   

Met Gala मध्ये 'या' तीन पदार्थांवर आहे बंदी; यंदाच्या मेट गालाचा मेन्यू बघून थक्क व्हाल!

Met Gala 2024: मेट गाला जगातील सगळ्यात मोठा फॅशन इव्हेंट आहे. या इव्हेंटमध्ये भारतासह जगातील दिग्गज सेलिब्रिटी सहभागी होतात. या वर्षीच्या मेट गाला 2024 चे थीम गार्डन गार्डन ऑफ टाइम: एन ऑड टू आर्ट अँड एटरनिटी ठेवण्यात आली आहे. 6 मे 2024 रोजी मेगा फॅशन इव्हेंट आयोजित करण्यात आला होता. मात्र, भारतात 7 मे 2024 रोजी हा इव्हेंट पाहायला मिळाला. तुम्हाला माहितीये का या इव्हेंटमध्ये या तीन पदार्थांवर बंदी आहे. 

यंदाच्या मेट गाला 2024 मध्ये कोणते पदार्थ करण्यात आले?

फॅशनप्रमाणेच मेट गालामध्ये खाद्यपदार्थाचीही थीम ठेवण्यात आली आहे. कॅटरर ऑलिव्हर चेंग यांनी यंदाच्या इव्हेंटमध्ये अनेक प्रकारचे पदार्थ बनवले होते. त्यांनी व्होग या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. ते म्हणतात की, आम्हाला असा एक मेन्यू बनवायचा होता तो थोडा रोमॅन्टिक व वेगळा असेल. स्टार्टर्ससाठी ओलिवियर चेंग यांनी एक स्प्रिंग व्हेजिटेबल सलाड  बनवले होते. त्यात ऑलिव्ह क्रम्बल, बटर फ्लाय शेपचे क्रुटोंस, बिगफ्लॉवर फोम आणि रास्पेबेरी विनेग्रेट देखील होते. तर, स्वीट डिशमध्ये फेयरी टेल स्नो व्हाइटने प्रेरणा घेऊन स्वीड डिश बनवली होती. त्यात बदाम क्रीमेक्स सर्व्ह केले होते. या रिपोर्टनुसार, जेवण, इव्हिटेशन, मेनू कार्ड सर्व इव्हेंटच्या दृष्टीने बनवण्यात आले होते. 

मेट गालामध्ये या पदार्थांवर बंदी?

मेट गालामध्ये खाद्यपदार्थ इव्हेंटच्या दृष्टीने तयार करण्यात येतात. मात्र, त्यावेळी एका गोष्टीची काळजी घेतली जाते की या पदार्थांमध्ये ज्या जेवणामुळं तोंडाला दुर्गंधी येईल असे पदार्थ टाळले जातात. जसं की, कांदा-लसूण वापरले जात नाही. त्याचबरोबर जेवणात ब्रूशेटादेखील खाल्ले जात नाही. कारण जेवताना कपड्यांवर डाग लावला तर कितीही प्रयत्न केले तरी तो जात नाही. त्यामुळं ड्रेस खराब होण्याचा धोका असतो. 

आलिया भट्टचा लूक 

बॉलिवूड अभिनेत्री सलग दुसऱ्यांदा मेट गालामध्ये सहभागी झाली होती. आलिया भट्टने यावर्षीच्या इव्हेंटमध्ये मिंट ग्रीन फ्लोरल रंगाची साडी नेसली होती. सब्यसाचीने ही साडी डिझायन केली होती. आलियाची साडी आणि स्टाइलची खूप चर्चा होत आहे. रेड कार्पेटवरील तिचे फोटोंना खूप लाइक्स मिळाले आहेत. आलिया भट्टीची साडी बनवण्यासाठी 1965 तास लागले होते. ही साडी 163 कामगारांनी ही साडी बनवली होती. 

Read More