Marathi News> मनोरंजन
Advertisement

वाईट स्पर्शावर या अभिनेत्रींनी सहकलाकारांना शिकवला चांगलाचं धडा

कोणत्या अभिनेत्रींनी शिकवला त्यांच्या सहकलाकारांना धडा...

वाईट स्पर्शावर या अभिनेत्रींनी सहकलाकारांना शिकवला चांगलाचं धडा

मुंबई : विश्व नगरीत आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी अनेक मुलं/ मुली येतात. पण स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे.  विशेष म्हणजे मुलींच्या वाट्याला अनेक वाईट अनुभव येतात. करियर संपेल याची भीती मनात बाळगून काही अभिनेत्री  गप्प बसतता आणि होणारा अत्याचार सहन करतात. तर काही अभिनेत्रींनी मात्र अशा व्यक्तींना चांगलाचं धडा शिकवला आहे.  या प्रसंगाला फक्त  नव्या अभिनेत्री नाही तर प्रसिद्ध अभिनेत्री देखील बळी पडल्या आहेत. जाणून घ्या असेचं काही प्रसंग....

अभिनेत्री जया प्रदा

fallbacks


80 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री जया प्रदा यांनी एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सहकलाकार दिलीप  ताहील यांना कानशीलात लगावली होती. रिपोर्टनुसार दिलीप ताहीन यांचं एका सीन दरम्यान स्वतःवरचं नियंत्रण सूटलं. तेव्हा जया यांनी  दिलीप यांना कानशीलात लगावली आणि म्हणाल्या हा चित्रपट आहे, खरं आयुष्य नाही. 

राधिका आपटे

fallbacks


बॉलिवूडची सर्वात बोल्ड आणि हॉट अभिनेत्री म्हणजे अभिनेत्री राधिका आपटे. जेव्हा राधीका दाक्षिणात्य चित्रपटाचं चित्रीकरण करत होती तेव्हा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेत्याने पायांना हात लावला होता. तेव्हा राधीकाने त्याला जोरदार कानशीलात लगावली. 

याआधी अभिनेत्री यासर्व गोष्टी उघडपणे सांगत नव्हत्या. पण आता अभिनेत्री इंडस्ट्रीमधील काळं सत्य, कास्टिंग काऊच, गटबाजी, घराणेशाही या सगळ्या गोष्टींवर उघडपणे बोलतात. 

Read More