Marathi News> मनोरंजन
Advertisement

हे बॉलिवूड स्टार आहेत 'लंगोटी यार', शाळा ते सिनेमा सगळीकडेच टफ फाईट

बॉलिवूडमध्ये अनेक स्टार्स एकमेकांना टक्कर देताना दिसतात. पण असे काही स्टार्स आहेत जे शाळेपासूनचे मित्र आहेत.

हे बॉलिवूड स्टार आहेत 'लंगोटी यार', शाळा ते सिनेमा सगळीकडेच टफ फाईट

मुंबईः बॉलिवूडमध्ये अनेक स्टार्स एकमेकांना टक्कर देताना दिसतात. पण असे काही स्टार्स आहेत जे शाळेपासूनचे मित्र आहेत पण पडद्यावर वेळोवेळी आव्हान म्हणून समोर आले आहेत.

fallbacks

श्रद्धा कपूर- टायगर श्रॉफ: 'बागी' चित्रपटातील श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफची जोडी लोकांना खूप आवडली. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हे दोन्ही कलाकार एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफ मुंबईतील एका शाळेत एकत्र शिकले.

fallbacks

सलमान खान- आमिर खान: बॉलिवूडचे दोन खान, सलमान खान आणि आमिर खान हे शाळेपासूनचे मित्र आहेत. आमिर खानने खुलासा केला होता की तो आणि सलमान इयत्ता 2 मध्ये एकत्र शिकले होते. मात्र शाळेत ते दोघे एकमेकांना ओळखत नव्हते.

fallbacks

वरुण धवन- अर्जुन कपूर:  अभिनेता वरुण धवन आणि अर्जुन कपूर हे लहानपणापासूनचे खूप चांगले मित्र आहेत. दोघेही वर्गमित्र आहेत. दोघांनीही शाळेत एकत्र शिक्षण घेतलंय.

fallbacks

ट्विंकल खन्ना- करण जोहर: एकेकाळी अभिनयाच्या दुनियेत स्टार असणारी ट्विंकल खन्ना ही बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक करण जोहरची बालपणीची मैत्रीण आहे. हे दोघेही एकाच शाळेत शिकले आहेत.

fallbacks

अथिया शेट्टी- कृष्णा श्रॉफ: बॉलीवूड अभिनेत्री आणि सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी आणि जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा, या दोघींनीही बालपणात एकत्र शिक्षण घेतले होते.

Read More