Marathi News> मनोरंजन
Advertisement

आईच्या एका अटीमुळे सेलिब्रिटींची 'अधुरी प्रेम कहानी...'

काही सेलिब्रिटीच्या प्रेमाच्या चर्चा तुफान रंगल्या, चाहत्यांनी देखील जोडप्यांना डोक्यावर धरलं... पण आईच्या त्या अटीनं केला घात   

आईच्या एका अटीमुळे सेलिब्रिटींची 'अधुरी प्रेम कहानी...'

मुंबई : बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये दरवर्षी अनेक नाती जुळतात आणि तुटतात. सेलिब्रिटी कायम त्यांच्या नात्यामुळे चर्चेत असतात. सतत जोडी चर्चेत असतात, अचानक झालेलं ब्रेकअप अनेक सेलिब्रिटींना पचवणं कठीण ठरलं. असे अनेक कलाकार आहेत, ज्यांच्या आईच्या एका अटीने अनेक जोडप्यांच्या नात्याचा अंत झाला. चला जाणून घेऊया बॉलीवूड इंडस्ट्रीतील कोणत्या नात्याला आईची मान्यता मिळू शकली नाही.

कतरिना कैफ आणि रणबीर कपूर 
एक काळ असा होता जेव्हा रणबीर आणि कतरीनाच्या नात्याच्या चर्चा तुफान रंगल्या. सिनेमाच्या शुटिंगदरम्यान त्यांच्यात प्रेमाचा गुलाब बहरला. रणबीर कपूरची आई नितू कपूर यांनी दोघांनाचं नातं मान्य नव्हतं. त्यामुळे रणबीर आणि कतरिनाचं ब्रेकअप झालं. 

अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर
अभिनेते अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची मुलगी श्वेता नंदाच्या लग्नत अभिषेक आणि करिश्माची ओळख झाली. पहिल्याचं नजरेत दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. पण करिश्माची आई बबीता यांना दोघांचं नातं मान्य नव्हतं.. म्हणून ही जोडी कायमची वेगळी झाली. 

राणी मुखर्जी आणि गोविंदा
राणी मुखर्जी आणि गोविंदा या जोडीने एक काळ गाजवला. याच दरम्यान दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा देखील रंगू लागल्या. पण गोविंदाचं लग्न झालं होत. त्यामुळे रणीच्या आईले मुलीचं नातं मान्य नव्हत.

करीना कपूर आणि शाहीद कपूर 
करीना - शाहीद अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. बहिण करिश्मा आणि आई बबीताला मात्र नातं मान्य नव्हतं. म्हणून दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 

Read More