बॉलिवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेला सुपरस्टार आमिर खान अचानक प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. आमिर खानने त्याच्या आयुष्यात दोनदा लग्न केले आहे आणि दोन्ही पत्नींपासून घटस्फोट घेतला आहे. आमिर खानची पहिली पत्नी रीना दत्ता आहे, जिच्याबद्दल अभिनेत्याने अलिकडच्या मुलाखतीत एक धक्कादायक खुलासा केला आहे. आमिरच्या पहिल्या लग्नाबद्दलची ही गोष्ट त्याच्या चाहत्यांना क्वचितच माहित असेल. या मुलाखतीत आमिर खान बरंच काही बोलून गेला आहे.
आमिर खानने दिल्लीतील इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये भाग घेतला, जिथे त्याने खुलासा केला की, तो त्याची पहिली पत्नी रीना दत्तासोबत पळून गेला होता आणि 1986 मध्ये तिच्याशी लग्न केले होतं. जेव्हा आमिर खान अवघ्या 21 वर्षांचा होता. हो, आमिर आणि रीना घरातून पळून गेले आणि लग्न केले. त्याच्या पहिल्या लग्नाबद्दल बोलताना आमिर म्हणाला, "आम्ही पळून जाऊन लग्न केले." आमिरचे हे ऐकून सगळेच थक्क झाले.
यावेळी आमिरने सांगितले की, रीना आणि माझे लग्न झाले होते आणि आम्ही दोघेही १६ वर्षे एकत्र राहिलो. आम्ही पळून जाऊन लग्न केले. आमिर आणि रीना 16 वर्षे एकत्र राहिले आणि नंतर दोघांनीही परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आमिर-रीना यांना दोन मुले आहेत, मुलगा जुनैद आणि मुलगी आयरा. आयरा विवाहित आहे आणि जुनैदने 2024 मध्येच चित्रपटसृष्टीत प्रवेश केला.
या कॉन्क्लेव्हमध्ये आमिर खानने त्याच्या दोन्ही पूर्वाश्रमीच्या पत्नींबद्दल बोलताना म्हटले, "माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे नाते हे या दोन अद्भुत व्यक्तींसोबत होते, रीना आणि किरण. दोघेही अद्भुत लोक आहेत आणि मी माझे आयुष्य या दोन्ही महिलांसोबत घालवले आहे आणि दोघांनीही मला खूप काही दिले आहे." आम्ही आमच्या नात्यात पुढे गेलो असलो तरी, मी अजूनही रीना-किरण आणि त्यांच्या कुटुंबाचा खूप आदर करतो. ती माझ्या आई आणि बाबांच्या खूप जवळ आहे आणि रीनाच्या वडिलांचे काही काळापूर्वी निधन झाले आहे आणि मी तिच्या कुटुंबाच्या खूप जवळ आहे.