Marathi News> मनोरंजन
Advertisement

बोल्ड सीन्स देऊनही बॉलिवूडमध्ये करिअर करण्यात अपयशी ठरल्या 'या' अभिनेत्री

Bold actress failed in Bollywood | मल्लिका शेरावत, उदिता गोस्वामी, तनुश्री दत्ता आणि शर्लिन चोप्रा ही काही अभिनेत्रींची नावे आहेत ज्यांनी बॉलिवूडमध्ये आपली बोल्ड स्टाईल दाखवली पण तरीही बॉलिवूडमध्ये अपेक्षित करिअर करू शकल्या नाहीत.

बोल्ड सीन्स देऊनही बॉलिवूडमध्ये करिअर करण्यात अपयशी ठरल्या 'या' अभिनेत्री

 

मुंबई : बॉलिवूडमधील एकापेक्षा एक अभिनेत्री तुम्ही पाहिल्या असतील. काहींनी तर चित्रपटांमध्ये बोल्ड सीन्स देऊन आपली बोल्ड स्टाईल दाखवली. यातील काही सौंदर्यवतींना काही चित्रपट मिळाले पण हळूहळू सर्व गायब झाल्या आणि त्यांना बॉलिवूडमध्ये करिअर करता आले नाही. काहीजणी आज आपल्या कौटुंबिक जीवनात परतल्या आहेत. या यादीत मल्लिका शेरावत, उदिता गोस्वामी, तनुश्री दत्ता आणि शर्लिन चोप्रा यांसारख्या अभिनेत्रींच्या नावांचा समावेश आहे. 

मल्लिका शेरावत

fallbacks

मल्लिका शेरावतला  ख्वाहिश  या चित्रपटातून प्रसिद्धी मिळाली. यानंतर सर्वजण तिला मर्डरवरून ओळखू लागले, मात्र आणखी काही चित्रपट केल्यानंतर ती बॉलिवूडमधून जवळजवळ गायब झाली आणि आज तिचे नाव बॉलिवूडमधून गायब झाले.

उदिता गोस्वामी

fallbacks

जहर आणि अक्सर सारख्या चित्रपटात तुम्ही उदिताला पाहिलं असेल. आणि हिमेश रेशमियाचे झलक दिखलाजा हे गाणे कसे विसरता येईल. मात्र या काही निवडक चित्रपटांनंतर आज ती कुठेच दिसत नाही.

कोईना मित्रा

fallbacks

साकी साकी या गाण्यावर थिरकणारी अभिनेत्री कोएना मित्रा हिने आपल्या मनमोहक शैलीने प्रेक्षकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. पण मित्रादेखील आता बेपत्ता आहेत. ती शेवटची बिग बॉस 13 मध्ये दिसली होती.

गीता बसरा

fallbacks

गीता बसरा यांनी क्रिकेटर हरभजन सिंगसोबत लग्न केले आहे. पण त्याआधी तिने द ट्रेन सारख्या चित्रपटात तिची बोल्ड सीन्स दिले आहे. मात्र सध्या ती चित्रपटांपासून दूर आहे.

शर्लिन चोप्रा

fallbacks

शर्लिन चोप्रा टाईमपास आणि  रेड स्वास्तिक सारख्या चित्रपटात होती. तिने बॉलिवूडला एकापेक्षा एक बोल्ड सीन्स दिले. पण तरीही निर्मात्यांनी तिला काम देणे बंद केले.

सेलिना जेटली

fallbacks

सेलिना जेटलीला तुम्ही जानशीन या चित्रपटात पाहिलं असेल. त्यावेळी तिचा बोल्ड लूक लोकांना खूप आवडला होता. पण नंतर हळूहळू तिला काम मिळणे बंद झाले.

नेहा धुपिया

fallbacks

नेहा धुपियाने तिच्या बोल्ड स्टाईलने चित्रपटांमध्ये प्रवेश केला होता, मात्र त्यानंतर ती आता मोजक्याच पात्रांमध्ये दिसत आहे. ए थर्सडे या चित्रपटात ती अखेरची दिसली होती.

मेघना नायडू

fallbacks

काली का चमन या गाण्यात मेघनाला बोल्डनेसचा कहर करताना तुम्ही पाहिले असेलच. यानंतर तिने हवस नावाच्या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पणही केले, पण तीही नंतर दिसली नाही.

समीरा रेड्डी

fallbacks

मुसाफिर या चित्रपटातून प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री समीरा रेड्डी सध्या चित्रपटांपासून दूर असून ती आपले कौटुंबिक जीवन जगत आहे. पण एकेकाळी ती तिच्या बोल्ड स्टाइलसाठी प्रसिद्ध होती.

तनुश्री दत्ता

fallbacks

तनुश्री दत्ताला 'आशिक बनाया आपने' या गाण्यातून प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटातील गाण्यांनी तर धुमाकूळ घातला होता. मात्र, यानंतर तनुश्रीचे काम मिळाले नाही आणि ती अमेरिकेला गेली.

Read More