Marathi News> मनोरंजन
Advertisement

कतरिना आधी या 6 मुली Vicky Kaushal सोबत लग्नासाठी तयार, आज करोडोच्या मालकीण

 यात प्रसिद्ध अभिनेत्रींचा समावेश आहे. 

 कतरिना आधी या 6 मुली Vicky Kaushal सोबत लग्नासाठी तयार, आज करोडोच्या मालकीण

मुंबई : आपल्या मेहनती आणि कर्तृत्वाच्या जोरावर हिंदी चित्रपट जगतात महत्त्वाची ओळख निर्माण करणारा बॉलिवूड अभिनेता विक्की कौशलने 9 डिसेंबर रोजी कतरिना कैफसोबत लग्न केले. या दोघांच्या लग्नाची खूप चर्चा रंगली.

पण कतरिना कैफसोबत लग्नगाठ बांधण्याआधी विकीचे नाव अनेक मुलींसोबत जोडलं गेलं आहे. यात प्रसिद्ध अभिनेत्रींचा समावेश आहे. 

2015 मधला बॉलिवूड चित्रपट मसान तुम्हाला आठवत असेल, ज्याद्वारे अभिनेता विकी कौशलने बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केले. या चित्रपटात विकी कौशलसोबत अतिशय सुंदर आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री श्वेता त्रिपाठीही दिसली होती. शूटिंगच्या दिवसांमध्ये या दोघांमधील जवळीक खूप वाढली होती. त्या काळात या दोन्ही स्टार्समध्ये खूप चांगले बाँडिंग होते, पण त्यांचे नाते लग्नापर्यंत पोहोचले नाही.

fallbacks

2018 मध्ये रिलीज झालेल्या मनमर्जियां या चित्रपटात विकी कौशल अभिनेत्री तापसी पन्नूसोबत स्क्रीन शेअर करताना दिसला होता आणि याचदरम्यान ते दोघेही मित्र बनले होते. हळूहळू त्यांच्यात जवळीकही वाढू लागली पण त्यांच्यातील नातं पुढे वाढू शकलं नाही. पण आजही तापसी पन्नू आणि विकी कौशल एकमेकांचे चांगले मित्र आहेत.

fallbacks

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूरचे नाव देखील विकी कौशलसोबत जोडले गेले होते. मात्र काही कारणांमुळे त्यांचे मार्ग वेगळे झाले.

fallbacks

'भूत: द हॉन्टेड शिप'मध्ये विकी कौशल बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरसोबत स्क्रिन शेअर करताना दिसला होता. यावेळी त्यांच्यातील नात्यालाही सुरुवात झाल्याचं समोर आलं होतं.  असं बोललं जातं होतं की, त्यानंतर भूमी पेडणेकरने लीडर विक्कीला लग्नाची ऑफरही दिली होती, पण विकी कौशल तयार झाला नव्हता.

fallbacks


आजकाल बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टचे नाव अभिनेता रणवीर कपूरसोबत जोडले जात आहे, भूतकाळाबद्दल बोलायचे तर, एकेकाळी आलिया भट्ट आणि विकी कौशल यांच्यात खूप जवळीक होती आणि दोघेही एकमेकांना खूप पसंत करत होते. पण, कदाचित नशिबाला हे नाते मान्य नव्हते.

fallbacks


अभिनेत्री बनिता संधू ही विकी कौशलसोबत नुकताच प्रदर्शित झालेल्या सरदार उधम सिंग चित्रपटात दिसली होती. शूटिंगदरम्यान विकी कौशल आणि बनिता संधू एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, या दोन्ही स्टार्सनी या बातम्यांवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

fallbacks

विकी कौशल अभिनेत्री  हरलीन सेठीसोबतच्या रिलेशनशीपमुळे बराच चर्चेत होता. दोघांमध्ये जबरदस्त केमिस्ट्री होती. पण अखेर त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही.

Read More