Actor Who Owns Mansion : दाक्षिणात्या अभिनेता प्रभास हा चित्रपटसृष्टीतील सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. 'बाहुबली' या चित्रपटातून तो फक्त भारतातील प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिला नाही तर त्यानं परदेशातही चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. त्याच्या काही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली नसेल. पण त्याची नेटवर्थ कमी नाही. भारतात त्यांची एक हवेली असून त्या हवेलीची किंमत ही 60 कोटी आहे. इटलीमध्ये 40 कोटींचा व्हिला आहे. तर 24 कोटींता एक फार्महाऊस देखील आहे. चला तर जाणून घेऊया एकूण संपत्ती किती आहे.
प्रभासनं अनेक लग्झरी प्रॉपर्टीचा मालक आहे. त्याच्याजवळ हैदराबादमधील लोकप्रिय असलेल्या जुबली हिल्स परिसरात अनेक कोटींच्या किंमतीत लग्झरी बंगला आहे. त्याचे चाहते त्याच्या घराच्या बाहेर नेहमीच गर्दी करतात.
प्रभासनं जुबली हिल्समध्ये जे घरेदी केलं आहे. त्याची किंमत 60 कोटी रुपायांची कमाई केली. त्यानं 2014 मध्ये खरेदी केला होता. या घरात स्विमिंग पूलपासून उत्तम जिमपर्यंत सगळं काही आहे. जर फक्त जिमविषयी बोलायचं झालं तर त्यानं त्याच्या जीममध्ये 1.5 कोटी रुपयांचे इक्विपमेंट आहेत. ते त्यानं परदेशातून मागवले आहेत.
एका लोकल मीडिया हाऊसच्या रिपोर्ट्सनुसार, प्रभासनं अनेक ठिकाणी गुंतवणूक केली आहे. ज्यात एक इटलीमध्ये एक आलिशान व्हिला आहे. त्याचा हा व्हिला खरंच खूप सुंदर आणि भव्य आहे. रिपोर्ट्सनुसार, जेव्हा केव्हा त्यांना शूटिंगमधून वेळ मिळतो तेव्हा प्रभास त्याच्या खास आणि जवळच्या लोकांसोबक तिथे जातो. त्याशिवाय, जेव्हा तो तिथे नसतो तोपर्यंत त्याला तो भाडेतत्वावर ठेवतो. या व्हिलामध्ये टुरिस्ट आणि लोक लोकं भाडेतत्वावर राहतात. दरम्यान, असं देखील म्हटलं जातं की प्रभासला दरमहिन्याला या आलीशान प्रॉपर्टीमधून 40 लाख रुपये मिळतात. त्या आलिशान व्हिलाची किंमत ही 80-85 कोटी असल्याचं म्हटलं जातं.
हेही वाचा : जगातील सर्वात सुंदर महिलेनं दिला जुळ्या मुलांना जन्म; तिच्या सौंदर्यापुढं विज्ञानही नमलं
प्रभासला जवळपास लग्झरी गाड्या आहेत. त्याच्याकडे लॅम्बॉर्गिनी, रोल्स रॉयस आणि जगुआर लॅंड रोवर महागड्या गाड्या असतात. प्रभास चित्रपटांमध्ये जास्त काम करत नाही. पण तरी सुद्धा त्याची नेटवर्थ ही कमी नाही. असं म्हटलं जातं की प्रभासची एकूण नेटवर्थ ही जवळपास 250 कोटींची आहे.