Marathi News> मनोरंजन
Advertisement

या अभिनेत्याने शाहरुख , सलमानला टाकलं मागे; 23 चित्रपटातील 8 ब्लॉकबस्टर देणारा 'हा' अभिनेता आहे तरी कोण ?

इंडियन फिल्म इंडस्ट्रीमध्ये बरेच कलाकार असे आहेत ज्यांच्यासाठी त्यांचे चाहते वेडे आहेत. तसेच ही कलाकारा फक्त भारतात नव्हे तर परदेशातही प्रसिद्ध आहे. या अभिनेत्यानं बऱ्याचं प्रसिद्ध कलाकारांना मागे टाकले आहे. हा कलाकार कोण हे सर्वांच्याचं मनात पडलेला प्रश्नअसेल तर चला पाहुयात सविस्तर.. 

या अभिनेत्याने शाहरुख , सलमानला टाकलं मागे; 23 चित्रपटातील 8 ब्लॉकबस्टर देणारा 'हा' अभिनेता आहे तरी कोण ?

एंटरटेनमेंट फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक अभिनेत्याचे आपले स्वतःचे चाहते असतात. त्यांच्या चित्रपटाची घोषणा होताचं त्या चित्रपटाची वाट पाहु लागतात. यामध्ये देशातील most popular actors यांची यादी आलीये. यात 10 अभिनेत्यांची नावे समोर आलीयेत. आश्चर्यचकीच करणारी गोष्ट म्हणजे नं. 1वर बॉलिवूड नव्हे तर दाक्षिणात्यच्या अभिनेत्याचे नाव आहे. तर चला पाहुयात कोण आहे हा अभिनेता ज्याने बॉलिवूडच्या कलाकारांना देखील मागे टाकुन आपले स्थान नं. 1 वर आणले. 

पहिल्या क्रमांकावर आहे प्रभास  
ऑरमॅक्सवर टॉप मेल अ‍ॅक्टर्सची यादी आली आहे. ही यादी ऑक्टोबर 2024ची आहे. ज्यामध्ये पहिल्या क्रमांकावर प्रभासचे नाव आहे. या यादीमध्ये फक्त दोनचं बॉलिवूड अभिनेते आहेत. बाकी सगळे दाक्षिणात्य अभिनेते आहेत. यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर शाहरुख खान तर दहाव्या क्रमांकावर सलमान खान आहे.   

प्रसिद्धीचे कारण
प्रभासचा शेवटचा चित्रपट 'कल्कि 2898 एडी' हा होता. या चित्रपटात त्याच्यासोबत दीपिका पदुकोण, कमल हासन आणि अमिताभ बच्चन असे प्रसिद्ध कलाकार होते. या चित्रपटाने 1100 कोटींची कमाई केली. या चित्रपटाचा पहिला भाग तर सुपरहिट होता. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचे शुटींग सुरु झाली आहे. तसेच प्रभासचा 'सलार 2' हा चित्रपट देखील लवकरचं  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 2002ला प्रभासने आपल्या करिअरची सुरुवात 'ईश्वर' या चित्रपटाने केली. त्यानंतर त्याने अनेक चित्रपट केले ज्यांना प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिले. प्रभासला खरी प्रसिद्धी मिळाली ती म्हणजेचं 'बाहुबली'मुळे.  

Read More