Marathi News> मनोरंजन
Advertisement

चाळीतलं बालपण, अभिनयात स्ट्रगल; आज बॉलिवूडचा सुपरस्टार आहे 'हा' अभिनेता बायकोही टॉपची अभिनेत्री

Struggled in Career and now He and His Wife Both are Superstar : या अभिनेत्यानं चाळीत घालवलं बालपण; अभिनय क्षेत्रातील प्रवास कठीण तर आज 'तो' आणि त्याची बायको दोघेही सुपरस्टार

चाळीतलं बालपण, अभिनयात स्ट्रगल; आज बॉलिवूडचा सुपरस्टार आहे 'हा' अभिनेता बायकोही टॉपची अभिनेत्री

Vicky Kaushal : बॉलिवूडमध्ये आपलं स्थान मिळवायचं हे स्वप्न अनेक लोकं पाहतात. हजारो लोकं आहेत जे या शर्यतीत धावतात. ज्यांच्यात काही करून दाखवण्याची जिद्द असते. तर त्यांच्यातील काही लोकं काही काम करतात. आज आम्ही एका अशा अभिनेत्याविषयी बोलणार आहोत. ज्यांचे वडील इंडस्ट्रीमध्ये अ‍ॅक्शन दिग्दर्शक आहेत. तर अशात त्याला वाटलं की त्याला अभिनय क्षेत्रात काम मिळेल. पण असं झालं नाही आणि सुरुवातीला त्याला खूप स्ट्रगल करावं लागलं. पण आज अभिनेता हा इंडस्ट्रीमध्ये अनेक बड्या लोकांना टक्कर देताना दिसत आहे. 

आपण ज्या अभिनेत्याविषयी बोलतोय तो अभिनेता दुसरा कोणी नसून विकी कौशल आहे. विकी कौशलचा आज वाढदिवस आहे. आज विकी कौशल हा त्याच्या 37 वा वाढदिवस साजरा करतोय. त्यानं त्याच्या अभिनयानं सगळ्यांची मने जिंकली आणि प्रेक्षकांच्या मनावर एक छाप सोडली आहे. त्याला इथवर पोहोचायला खूप मेहनत घेतली. विकीनं अनेकदा त्याच्या मुलाखतींमध्ये सांगितलं की तिचं बालपण हे चाळीत गेलं आणि त्याचे वडील हे खूप मेहनत करायचे. अभिनेता जेव्हा त्याच्या वडिलांसोबत चित्रपटाच्या सेटवर जायचा. त्यामुळे त्याला अभिनयात करिअर करण्याची इच्छा झाली. त्यासाठी त्यानं अनेक ऑडिशन्स दिले, अनेक ठिकाणी सतत जाऊन काम मागत राहिला. त्यामुळे त्याला 'गॅंग्स ऑफ वासेपुर' मध्ये एक छोटी भूमिका मिळाली. 

हेही वाचा : 11 वर्षानंतर आमिर आणि राजकुमार हिरानी एकत्र; सिनेसृष्टीतील 'या' मराठी दिग्गज व्यक्तीवर बनवणार बायोपिक

विकी कौशलला त्याच्या करिअरमधील सगळ्यात पहिला ब्रेक हा 2015 मध्ये 'मसान' या चित्रपटातून मिळाला. चित्रपटाची पटकथा ही खूप चांगली होती पण विकीला त्यातून काही ओळख मिळाली नाही. त्यानंतर 2016 मध्ये 'रमन राघव' मध्ये देखील विकी कौशलनं नवाजुद्दीनी सिद्दीकीसोबत भूमिका साकारली होती. त्यानंतर विकी हा आलिया भट्टसोबत तिच्या 'राजी' या चित्रपटात दिसला. या चित्रपटात त्याची छोटी भूमिका होती. पण विकीनं त्याच्या अभिनयानं सगळ्यांची मने जिंकली. तर 2018 मध्ये रणबीर कपूरसोबत तो संजू या चित्रपटात दिसला. या चित्रपटात देखील त्यानं सह-कलाकाराची भूमिका साकारली होती. मात्र, त्यानंतर त्याचं नशिब पालटलं आणि 2019 मध्ये 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' हा चित्रपट त्याला मिळाला. त्यानंतर विकीची सगळीकडे चर्चा रंगली. त्यानंतर विकी हा बॉलिवूडमधील रायझिंग स्टार झाला. सगळ्यात शेवटी तो 'छावा' या चित्रपटात दिसला. या चित्रपटात त्यानं छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती. 

Read More