Marathi News> मनोरंजन
Advertisement

'ट्रॅजडी क्वीन' मीना कुमारी यांची भूमिका साकारणार 'ही' बॉलिवूड अभिनेत्री, ठरू शकतो कमबॅक सिनेमा

This Actress Got Approached for Meena Kumari :  या बॉलिवूड अभिनेत्रीला मिळाली 'ट्रॅजडी क्वीन' मीना कुमारी यांची भूमिका

'ट्रॅजडी क्वीन' मीना कुमारी यांची भूमिका साकारणार 'ही' बॉलिवूड अभिनेत्री, ठरू शकतो कमबॅक सिनेमा

This Actress Got Approached for Meena Kumari : बॉलिवूडच्या 'ट्रॅजेडी क्वीन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मीना कुमारी यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या चित्रपटाची अधिकृत घोषणा झाल्यापासून चित्रपटसृष्टीमध्ये ही भूमिका कोण साकारणार यावरून चर्चा सुरु आहे. याचित्रपटाची निर्मिती सिद्धार्थ पी. मल्होत्रा करणार असून सारेगामा आणि अमरोही कुटुंबाच्या मदतीनं हाती घेतला आहे. पण अजूनही त्या अभिनेत्रीच्या नावाची घोषणा झालेली नाही, जीआपल्याला मीना कुमारी यांची भूमिका साकाराताना दिसणार आहे. त्यासोबत, मीनाजींचे पूर्वाश्रमीची पती आणि दिग्दर्शक कमाल अमरोही यांची भूमिका कोण करणार? यावरही अजून काही माहिती समोर आलेली नाही.

कियाराशी सुरू आहे चर्चा

'पिंकव्हिला'नं दिलेल्या एका रिपोर्टनुसार, या बायोपिकसाठी निर्माते कियारा अडवाणीशी चर्चा करत आहेत. दिग्दर्शक आणि क्रिएटिव्ह टीमला वाटतं की कियारामध्ये एक ग्रेस आहे, शिवाय ती जेव्हा इमोशन्ल परफॉर्मन्स देते तो सर्वोत्तम असतो असं त्यांचं म्हणणं आहे. जे मीना कुमारी यांच्यासारख्या डीप, क्लासिक भूमिकेसाठी योग्य वाटतं. कियाराला स्क्रिप्टही ऐकवण्यात आली असून तिला आवडली आहे. मात्र,तिनं अजून 'हो' म्हटलेलं नाही.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

दरम्यान, जर कियारा ही भूमिका साकारण्यास तयार झाली, तर ही तिच्या मॅटरनिटी ब्रेकनंतरचा पहिलाच चित्रपट असेल. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता खूप जास्त आहे. मीना कुमारी यांचं आयुष्य अनेक भावनांनी भरलेलं होतं, प्रेम, दु:ख, संघर्ष आणि हे सर्व पडद्यावर दाखवणं कियारासाठी एक मोठं आव्हान आणि संधी असेल.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

सध्या कियाराकडे ‘वॉर 2’ आणि ‘टॉक्सिक’ हे 2 मोठे प्रोजेक्ट्स आहेत. पण जर ती मीना कुमारी यांची भूमिका स्वीकारते, तर यातून कियारा ही तिच्या करिअरमधील एक वेगळी ओळख निर्माण करू शकते. त्यामुळे आता कियारा नक्की काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

हेही वाचा : 'पंचायत 4' च्या सचिवजीला 'जीतू भैया' चा टॅग कसा मिळाला? स्वत: जितेंद्र कुमारनं केला खुलासा

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच कियारानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ती आणि सिद्धार्थ मल्होत्रा आई-वडील होणार असल्याची गोड बातमी चाहत्यांना दिली. त्यानंतर ती अनेक कार्यक्रमांमध्ये स्पॉट झाली. आता त्या दोघांचे चाहते त्यांच्या होणाऱ्या बाळाची प्रतीक्षा करत आहेत. 

Read More