Marathi News> मनोरंजन
Advertisement

ही अभिनेत्री ईशान खट्टरची आवडती योग पार्टनर; अफेयरच्या रंगल्या चर्चा

कोण आहे ईशानची आवडती योग पार्टनर? 

ही अभिनेत्री ईशान खट्टरची आवडती योग पार्टनर; अफेयरच्या रंगल्या चर्चा

मुंबई : अभिनेता ईशान खट्टर सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असतो. ईशान कायम सोशल मीडियाच्या माध्यामातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. नुकताचं त्याने चाहत्यांसोबत संवाद साधला. प्रश्न-उत्तरांच्या या सेशनमध्ये ईशानला त्याच्या खासगी आयुष्याबद्दल देखील प्रश्न विचारण्यात आले. ईशानने देखील चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे तितक्याचं उत्सुकतेने दिली. सेशनमध्ये ईशानला आवडतीच्या योग पार्टनरबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा ईशानने त्याच्या आवडत्या योग पार्टनरचा फोटो शेअर केला आहे. 

fallbacks

आवडत्या योगा पर्टनरचा फोटो शेअर करत त्याने आनन्या माझी आवडती योगा पार्टनर आहे असं सांगितलं आहे. ईशानबद्दल सांगायचं झालं तर तो अत्यंत फिटनेस फ्रिक आहे. लॉकडाऊनमध्ये ईशान भाऊ शाहीद कपूर आणि मीरा राजपूतसोबत योग करताना दिसायचा. शाहीद आणि ईशानमध्ये अतिशय प्रेमळ नातं आहे. शाहीद आणि ईशानचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असातात. 

ईशानच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, त्याच्या आणि अनन्याच्या नात्याबद्दल तुफान चर्चा रंगली होती. दोघे एकत्र व्हेकेशनसाठी देखील गेले होते. ईशान आणि अनन्या 'खाली पिली ' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आले होते. चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. चित्रपटातील अनन्याच्या भूमिकेचं देखीलव कौतुक झालं होतं. 

ईशान आता लवकरचं 'फोन बूथ' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. चित्रपटात अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी देखील मुख्य भूमिकेत झळकणार आहे. 

Read More